1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

न्यूरोलॉजिकल सर्जन्सची वर्धेत होणार 12 वी वार्षिक परिषद

Spread the love

नागपूर: न्यूरोसर्जनच्या मध्य-पश्चिम अध्याय “MCNS 2022” ची 12 वी वार्षिक परिषद दत्ता मेघे सभागृह, जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय, सावंगी, वर्धा येथे
येथे दि.7 आणि 8 एप्रिल रोजी होणार असल्याचे डॉक्टर संदीप इरवतकर आणि डॉ श्याम बाभुळकर यांनी आज दि ४ एप्रिल रोजी आयोजित पत्रपरिषदेत माहिती दिली. यावेळी प्रिझम इव्हेंट्स कौस्तुभ बिडकर आणि डॉक्टर मंगरूळकर उपस्थित होते.

संमेलनाचे उद्घाटन 8 एप्रिल 2022 रोजी दुपारी 12 वाजता आदरणीय सागर मेघे यांच्या उपस्थितीत होणार आहे. माननीय डॉ. वेदप्रकाश मिश्रा, प्र कुलगुरू DMIMS (डिम्ड टू बी युनिव्हर्सिटी) प्रमुख पाहुणे असतील. माननीय डॉ. ललित बाघमारे, प्र-कुलगुरू, DMIMS (डिम्ड टू बी युनिव्हर्सिटी) हे सन्माननीय अतिथी असतील. माननीय श्री दत्ताजी मेघे कुलपती, दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थान DMIMS (Deemed to be University) हे मुख्य संरक्षक उपस्थित राहणार आहेत.

या दोन दिवसीय परिषदेत माननीय डॉ. वेदप्रकाश मिश्रा, प्र-कुलगुरू, माननीय डॉ. राजीव बोरले, कुलगुरू, माननीय डॉ. एस. एस. पटेल, मुख्य समन्वयक, डॉ. संदीप श्रीवास्तव, डीन जवाहरलाल नेहरु वैद्यकीय महाविद्यालय (JNMC) डॉ चंद्रशेखर देवपुजारी, मेंटर, न्यूरो सर्जरी विभाग, जेएनएमसी, सावंगी. डॉ. एच. जी. देशपांडे, वरिष्ठ न्यूरोसर्जन, डॉ. मिलिंद देवगावकर, व्हिजिटिंग प्रोफेसर, न्यूरो सर्जरी विभाग संघटक अध्यक्ष डॉ. श्याम बाभुळकर, संघटक सचिव डॉ. संदीप इरतवार. आणि डॉ. अक्षय पाटील, हे वैज्ञानिक समितीचे अध्यक्ष मार्गदर्शक म्हणून सहकार्य करतील.

आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात (AVBRH,) सावंगी मेघे येथे 7 एप्रिल रोजी थेट शस्त्रक्रिया कार्यशाळा होणार आहे. ज्यात डॉ सी ई देवपुजारी (मुंबई), डॉ दिलीप पणीकर (कोचीन), डॉ श्रीनिवास रोहिदास (कोल्हापूर) यांसारखे राष्ट्रीय प्राध्यापक तरुण न्यूरोसर्जन्सना एंडोस्कोपिक आणि मायक्रो न्यूरोसर्जिकल ऑपरेशन्सचे प्रात्यक्षिक दाखवतील. या 2 दिवसीय परिषदेत संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यातील 150 न्यूरोसर्जन सहभागी होऊन त्यांचे ज्ञान आणि अनुभव मांडणार आहेत. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकार आहे, असे डॉ. संदीप इरतवार, “MCNS 2022” चे संघटक सचिव, प्राध्यापक आणि प्रमुख, न्यूरोसर्जरी विभाग, जवाहरलाल नेहरु, सावंगी मेघे यांनी सांगितले.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    यंदाही धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्यास प्रशासनाची ना..!!!

    October 4th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसलग तिसऱ्या वर्षीही नागपुरातील धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यास प्रशासनाने मनाई केली ही बाब लाखो आंबेडकरी जनत...

    हिंगणघाटच्या मोहता मिल मजूरांवर उपासमारीची वेळ

    February 2nd, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveआज साखळी उपोषणाचा पाचवा दिवस वर्धा/हिंगणघाट: आर. एस.एस. मोहता मिल हिंगणघाट येथील मिलमध्ये अनेक वर्षापासून ब...

    प्रजासत्ताक दिनी पत्रकारांचे वार्षिक संमेलन व पुरस्क...

    January 28th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर: टिळक पत्रकार भवन ट्रस्ट (TPBT), नागपूर युनियन ऑफ वर्किंग जर्नालिस्ट (NUWJ) आणि पत्रकार क्लब ऑफ नागप...