1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

केंद्र सरकारने केले ‘यांना’ अतिरिक्त अधिकार प्रदान

thumbnail-wordpress-thefreemedia
Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने सार्वजनिक क्षेत्रातल्या उद्योगांच्या संचालक मंडळांना त्यांच्या अधिपत्याखालील संयुक्त उपक्रमामधील त्यांच्या सहाय्यक कंपन्या, किंवा युनिट्स मधल्या निर्गुंतवणूकीचे ( दोन्ही : धोरणात्मक निर्गुंतवणूक आणि अंशतः निर्गुंतवणूक) किंवा ते बंद करण्याबाबतची प्रक्रिया हाती घेण्याची शिफारस करण्याचे आणि पर्यायी यंत्रणेला अतिरिक्त अधिकार प्रदान करण्यासाठीचे अधिकार बहाल केले आहेत.

मंत्रिमंडळाने पर्यायी यंत्रणेला निर्गुंतवणुकीसाठी (दोन्ही धोरणात्मक निर्गुंतवणूक आणि अंशतः विक्री ) / सार्वजनिक क्षेत्रातल्या उद्योगांच्या संयुक्त उपक्रमामधील त्यांच्या सहाय्यक कंपन्या, किंवा युनिट्स किंवा समभागांची विक्री बंद करण्यासाठी तत्त्वतः मान्यता देण्याचा अधिकार दिला आहे [मात्र यामध्ये त्यांना सोपविण्यात आलेल्या सार्वजनिक क्षेत्रातल्या महारत्न कंपन्यांमधील निर्गुंतवणुक किंवा काही प्रमाणातल्या भागविक्रीचा अपवाद आहे ) तसंच पर्यायी यंत्रणेला, मुख्य सार्वजनिक उपक्रमातल्या कंपनीकडून केल्या जाणाऱ्या निर्गुंतवणुकीच्या किंवा उपकंपनी बंद करण्याच्या प्रक्रियेचा आढावा घेण्याचा अधिकार देखील प्रदान केला आहे.

सार्वजनिक क्षेत्रातल्या उद्योगांनी एखाद्या कंपनीतला पूर्ण हिस्सा काढून घेणे अर्थात धोरणात्मक निर्गुंतवणूकीचे व्यवहार किंवा कंपनी बंद करण्यासाठीची प्रक्रिया स्पर्धात्मक बोलीच्या तत्त्वांवर आधारित आणि निर्धारित मार्गदर्शक तत्त्वांशी सुसंगत ठेवणं अभिप्रेत आहे. धोरणात्मक निर्गुंतवणुकीसाठी, अशी मार्गदर्शक तत्त्वे (DIPAM ) गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाद्वारे आखली जातील तर कंपनी बंद करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे सार्वजनिक उपक्रम विभाग जारी करेल.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    काल दिवसभरात देशात 13 हजार 148 नव्या कोरोनाबाधितांची...

    February 24th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत थोडी घट झाली आहे. काल दिवसभरात देशात 14 हजार 148 नवीन कोरोनाबाधितांची न...

    अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणासाठी युनेस्कोच्य...

    July 8th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनवी दिल्ली: अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणासाठी युनेस्कोच्या 2003 परिषदेच्या आंतरसरकारी समितीचा सदस्य ...

    बाळासाहेब ठाकरे नसते; तर मोदींचे अस्तित्व केव्हाच सं...

    October 18th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveभास्कर जाधवांचे भाजपवर टीकास्त्र शिवसेना-भाजपमधील वाकयुद्ध शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यानंतर सुरुच आहे. दोन्ह...