1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

बाळासाहेब ठाकरे नसते; तर मोदींचे अस्तित्व केव्हाच संपले असते

Bhaskar Jadhav
Spread the love

भास्कर जाधवांचे भाजपवर टीकास्त्र

शिवसेना-भाजपमधील वाकयुद्ध शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यानंतर सुरुच आहे. दोन्ही पक्षांतील नेत्यांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कोकणातील शिवसेना नेत्याने टीकास्त्र डागले आहे. कोण नरेंद्र मोदी? बाळासाहेब ठाकरे नसते तर त्यांचे अस्तित्व केव्हाच संपले असते, अशी टीका कोकणातील शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी सावर्डे येथील एका मेळाव्यात बोलताना केली आहे.

उद्धव ठाकरेंनी काल एक भाषण केले आणि भाजपच्या लोकांची कोल्हेकुई सुरु झाली आहे. त्यांनतर भाजपचे सर्व नेते तुटून पडले आहेत. फक्त मराठी माणसेच भ्रष्टाचारी आहेत का? भाजपचे षडयंत्र तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. कारवाई फक्त मराठी माणसांवरच करता. यापूर्वी ईडी, एनसीबी, सीबीआय नव्हती का? जरा विरोधात बोलले की चौकशी लावतात. मराठी माणसाला संपवण्याचे काम सुरु आहे. हे केवळ मुंबई महानगर पालिका ताब्यात घेण्याकरता सुरु आहे. ७० वर्षे काँग्रेसने राज्य केले, पण त्यांनी कधी शिवसेना भवनाबद्दल कधी वाईट शब्द काढला नसल्याचे भास्कर जाधव म्हणाले.

शिवसेनेचे बोट धरून आज हे भाजपवाले महाराष्ट्रात मोठे झाले. देशामध्ये भाजप शिवसेना प्रमुखांमुळे मोठी झाली आहे. सोशल मिडीयावर आमच्या नरेंद्र मोदींचा फोटो लावून शिवसेनेवाले निवडणून आले म्हणून सांगतात. कोण नरेंद्र मोदी? जेव्हा १९८४ साली महाराष्ट्रामध्ये शिवसेनेसोबत युती केली, तेव्हा फक्त बाळासाहेबांच्या फोटोवर तुम्ही मोठे झाले आहात, असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.

Claim Free Bets

नरेंद्र मोदींना गुजरात दंगलीनंतर मुख्यमंत्री पदावरून काढून टाकण्याच्या निर्णयासाठी लालकृष्ण अडवाणी बाळासाहेबांना भेटायला आले. बाळासाहेबांनी वाटेल ते झाले तरी चालेल नरेंद्र मोदींना बदलायचे नाही, असे म्हटले. नरेंद्र मोदी बाळासाहेबांमुळेच देशाचे पंतप्रधान आहेत, नाहीतर त्या दिवशीच घरी गेले असते. बाळासाहेबांचे फोटो लावून तुम्ही तुमचा पक्ष वाढवला, असे भास्कर जाधव म्हणाले.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    ..तर, इलेक्ट्रीक गाड्या खरेदी करा; इंधन दरवाढीवर गडक...

    October 23rd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveइंधन दरवाढीने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. इंधन दरवाढ आता नवनवीन उच्चांक करताना दिसत आहे. त्यातच केंद्...

    “यूपी-बिहार वाले भैय्या” चन्नी यांच्या य...

    February 18th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर : पंजाब विधानसभा निवडणूकीसाठी २० फेब्रुवारी ला वोटिंग केले जाईल. नेत्यांच्या निवडणूक रॅली एकामागून ए...

    पंजाबात राजकीय संकट; अमरिंदर सिंग यांचा राजीनामा

    September 18th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveगुजरात पाठोपाठ आता पंजाबमध्येही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांन...