1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

सरकारने पेट्रोल डिजेलवर कर कपात केलीच नाही;ठाकरे सरकारने लोकांना मूर्ख बनविले :देवेंद्र फडणवीस

petrol-THEFREEMEDIA
Spread the love

नागपूर: महाविकास आघाडी सरकारने राणाभीमदेवी थाटात राज्यात इंधनावरील व्हॅट कमी झाल्याची माहिती शासकीय ट्विटर हँडलवरून प्रसारित केली. प्रत्यक्षात ही शुद्ध फसवणूक आहे.

महाविकास आघाडी सरकारने दरकपातीचा कोणताच निर्णय घेतला नाही, तर केंद्राच्या निर्णयाचा हा स्वाभाविक परिणाम आहे. असा घणाघात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीने घेतलेल्या करकपातीच्या निर्णयावर चढवला.

इंधनाची मूळ किंमत, विक्रेत्यांना दिले जाणारे कमिशन, रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेस तसेच अ‍ॅग्रीकल्चर अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट सेस अशा सर्व बाबींवर राज्य सरकार करआकारणी करते. त्यामुळे यापैकी कोणत्याही घटकातील कर केंद्राने कमी केला तर राज्याचा कर आपोआप कमी होतो. त्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोलवर 2.08 रुपये आणि डिझेलवर 1.44 रुपये जे कमी झाले, तो रोड अँड इन्फ्रास्ट्रक्चर सेस केंद्र सरकारने कमी केल्याने राज्याचा कर कमी झाला आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

स्वत: काहीच करायचे नाही आणि केंद्राने घेतलेल्या निर्णयाच्या परिणामांचे सुद्धा श्रेय घ्यायचे, हे फारच गंभीर आहे. महाविकास आघाडी सरकारने लोकांना मुर्ख न बनविता तत्काळ पेट्रोल-डिझेल दरकपातीचा निर्णय घ्यावा, ही माझी पुन्हा मागणी आहे. कालची घोषणा पाहून ‘उंटाच्या तोंडात जिरे’ असे मी म्हटले होते. पण, प्रत्यक्षात तर हा संपूर्ण प्रकार मे महिन्यात ‘एप्रिल फूल’ करणारा ठरला. असाही टोला त्यांनी लगावला.

Claim Free Bets

दरम्यान, केंद्र सरकारने कर कपात केल्याने पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले. यानंतर महाराष्ट्रात देखील कर कपातीची विरोधकांनी मागणी विरोधकांना लावून धरली. यानंतर पेट्रोल 2.08 रूपये तर डिझेलवर 1.44 रूपयांनी स्वस्त केल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र असा कोणताच निर्णय घेण्यात आला नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये खडाजंगी बघायला मिळण्याची शक्यता आहे.

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    अभ्यास करणं आमचं काम नाही, तसं असतं तर राजकारणात आलो...

    October 28th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमु्ंबईत एमएमआरडीएने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केलं आहे. या कार्यशाळेत मुंबई महानगर प्रदेशमधील भविष्यातील ...

    सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात मनुष्याकडून घृणास्पद प्रकार

    April 7th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveकोल्हापूर येथील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील गोठणे येथे एक किसळवाणा प्रकार उघडकीस आला आहे. विनापरवाना शस्त...

    ‘त्या’ छापेमारीमागचे सूत्रधार फडणवीसच; ...

    October 9th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, कार्यालये आणि त्यांच्या तीन बहिणींच्या संबंधित ...