1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

‘त्‍यांना’ सरकार पडणार या स्‍वप्‍नातच राहू द्‍या : मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे

Eknath_Shinde_Amey_thefreemedia
Spread the love

मुंबई- आम्‍हाला दोन तृतीयांश बहुमत आहे. १६६ आमदारांचा पाठिंबा आहे. त्‍यामुळे आमचे सरकार पडणार, हे संजय राऊत यांना पडलेले स्‍वप्‍न आहे. त्‍यांना स्‍वप्‍नातच राहू द्‍या, अशा शब्‍दात मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांचा समाचार घेतला. आज शिंदे यांनी लीलाधर डाकेंची भेट घेतली. यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

अनेक आमदार-खासदार मानसिकरित्या सध्याच्या सरकार सोबत नाहीत. ते संभ्रमावस्थेत आहेत. आज गेलेले अनेक आमदार आमच्या संपर्कात असून, भविष्यात महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्तापरिवर्तन झाल्यास आश्चर्य वाटायला नको, असे विधान खासदार संजय राऊत यांनी केले होते. त्याच्या या विधानावर मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रया दिली आहे.  शिंदे म्हणाले की, आमचे सरकार मजबूत आहे. १६६ आमदारांचा आम्हाला पाठींबा आहे.

संजय राऊत स्वप्न पाहत आहेत. त्यांना स्वप्नातच राहू द्या, असा टोला  त्यांनी लगावला. तसेच डाकेंच्या भेटीबद्ल बोलताना त्यांनी फक्त सदिच्छा भेट घेतली असल्याचे म्हटलं आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि शिवसेनेच्या नेत्यांच्या भेटींचा सिलसीला सुरूच असताना शिंदे यांनी  आज डाकेंची भेट घेतली. त्यामुळे शिवसेनेचे आमदार व खासदार यांच्यानंतर ज्येष्ठ नेतेही शिंदे गटात सामिल होणार का? असा सवाल उपस्थित केला आहे..

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    इंधन दरवाढ विरोधात कॉंग्रेसच्या वतीने आंदोलन व निदर्शने

    April 1st, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीच्या सरचिटणीस ॲड. नंदाताई पराते यांच्या नेतृत्वात आज दि ३१ मार्च रो...

    पाटणमध्ये १७ पैकी १५ जागा राष्ट्रवादीच्या ताब्यात

    January 19th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveसातारा जिल्ह्यातील पाटण नगरपंचायत निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादीचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर आणि युवा ...

    देशाच्या प्रथम नागरिक म्हणून एनडीएच्या उमेदवार द्रौप...

    July 22nd, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: देशाच्या प्रथम नागरिक म्हणून एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) विजयी. द्रौपदी मुर्म...