1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

46 कोटीचा साखर घोटाळा उघडकीस; परळीत आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

sugar
Spread the love

शंभू महादेव साखर कारखान्याच्या कथित ४६ कोटी रुपयांच्या साखर घोटाळ्यात सप्टेंबर रोजी उस्मानाबाद येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने परळी येथून वैद्यनाथ अर्बन बँकेचे सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन चितळे यांना ताब्यात घेतले. माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या ताब्यातील बँक अधिकाऱ्याच्या अटकेने राजकीय व सहकार वर्तुळात खळबळ उडाली आहे.

हावरगाव (ता.कळंब) येथील शंभू महादेव साखर कारखान्याने परळी येथील वैद्यनाथ बँकेकडे तारण म्हणून ठेवलेल्या ४६ कोटी रुपयांच्या साखर घोटाळाप्रकरणी १२ मार्च २०२१ रोजी कळंब ठाण्यात शंभू महादेव कारखान्याचा चेअरमन दिलीप आपटेसह ४० जणांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला होता. उस्मानाबाद आर्थिक गुन्हे शाखेकडे याचा तपास आहे. आतापर्यंत केवळ दोघांना पकडण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश आले. २ सप्टेंबर रोजी परळी येथून वैद्यनाथ बँकेचे सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन चितळेंना ताब्यात घेतले.

नेमकं काय आहे प्रकरण?

शंभू महादेव साखर कारखान्याने २००२ ते २०१७ ४७ कोटी २३ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. १५४१७७ एवढे साखरेचे पोते (तारण साखर साठा) असल्याचे भासवून दि वैद्यनाथ अर्बन को-आप बँक लि. मुख्य कार्यालय परळी या बँकेस तारण म्हणून साखर साठा ठेवल्याचे दाखवले. तारण असलेल्या साखरेचे गोदाम दि वैद्यनाथ अर्बन को-आप बँक लि. या बँकेने सील केले होते. यात अफरातफर झाली होती.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    करूणा शर्माचा कोठडीतील मुक्काम 18 सप्टेंबरपर्यंत

    September 14th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveकरूणा शर्मा परळीत दाखल झाल्यानंतर त्यांच्या गाडीत पिस्तूल आढळल्याने, एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी त्यांना...

    नागपूर जिल्ह्यातील कोराडीत साकारणार उर्जा शिक्षण पार...

    November 2nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveकोराडी औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या परिसरात लोकांना वीज कशी तयार होते याची माहिती देणारा उर्जा पार्क साक...

    स्वतःला खरे शिवसैनिक सांगणारे एकनाथ शिंदे कोण आहेत त...

    June 25th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: एकनाथ संभाजी शिंदे. मूळ गाव : सातारा. ९ फेब्रुवारी १९६४ साली शिंदे यांचा जन्म झाला. कट्टर शिवसैनिक ...