1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

अल कायदाचा म्होरक्या अल जवाहिरीचा अमेरिकेने केला खात्मा

thumbnail-wordpress-thefreemedia
Spread the love

अमेरिकेने अफगाणिस्तानमधील दहशतवादविरोधी मोहिमेत मोठं यश मिळवलं आहे. अमेरिकेने ड्रोन हल्ला करत दहशतवादी संघटना अल-कायदाचा म्होरक्या अल जवाहिरीला ठार केलं आहे. मोस्ट वॉण्टेड आणि ९/११ हल्ल्याचा मास्टरमाइंड असणाऱ्या जवाहिरीचा अमेरिकेने ड्रोन हल्ला करत खात्मा केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी जवाहिरीचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

जवाहिरीने अमेरिकेतील ९/११ हल्ल्यामध्ये समन्वय साधण्याचं काम केलं होतं. या हल्ल्यात ३ हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. २०११ मध्ये ओसामा बिन लादेनला ठार करण्यात आल्यानंतर जवाहिरी हा अल-कायदाचं नेतृत्व करत होता. जवाहिरीवर २४ मिलियन डॉलर्सचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये रविवारी सकाळी ड्रोन हल्ला केला असता त्यामध्ये जवाहिरीचा मृत्यू झाला.

जवाहिरी काबुलमधील त्याच्या घराच्या बाल्कनीत असताना ३१ जुलैला त्याच्यावर हल्ला करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. जो बायडन यांनी २५ जुलैला या हल्ल्यासाठी संमती दिली होती. घरामध्ये जवाहिरीचं कुटुंबदेखील होतं. मात्र त्यांना कोणतीही इजा झाली नसल्याचं अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

Claim Free Bets

जवाहिरीला ठार केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी ट्विट करत याला दुजोरा दिला आहे. “शनिवारी, माझ्या निर्देशानुसार, अमेरिकेने अफगाणिस्तानमधील काबुलमध्ये यशस्वीपणे हवाई हल्ला केला ज्यामध्ये अल-कायदाचा अल-जवाहिरी मारला गेला. न्याय मिळाला आहे,” अशा भावना जो बायडन यांनी व्यक्त केल्या आहेत.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    सहा राज्यांमध्ये नवीन कोविड-१९ डेल्टा व्हेरिएंटचा शि...

    October 27th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveयुके येथे प्रभावीपणे पसरणारा कोरोनाचा नवीन व्हेरिएंटचा शिरकाव भारतात देखील झाला आहे. आता पर्यंत भारतात कोरो...

    कृषी क्षेत्रात सहकार्य वाढवण्यास उझबेकिस्तान आणि भार...

    July 30th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनवी दिल्‍ली: उझबेकिस्तानचे उपपंतप्रधान जमशीद खोडजाव आणि केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद...

    माजी उपराष्ट्रपतींचा ‘काबूल वाडा’ आता ता...

    September 13th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveतालिबानी लढाख्यांनी काबूलमधील त्यांचा सर्वात कट्टर शत्रू आणि फरार माजी उपराष्ट्रपती अब्दुल रशीद दोस्तम यांच...