1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

तब्बल १२ तासाच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना अटक

anil-deshmukh
Spread the love

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने शंभर कोटी वसुली प्रकरणात अटक केली आहे. अनिल देशमुख यांना अखेर रात्री १२.३० वाजता अटक दाखवण्यात आली. तब्बल १२ तासाच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना ईडीने मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात अटक केली आहे. पाच समन्स पाठवल्यानंतर अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात वकीलासह हजर झाले होते.

अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींची बेकायदेशीर वसुली केल्याचा आरोप आहे. मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी लेखी पत्र देऊन हे आरोप केले होते. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने गुन्हा दाखल करून अनिल देशमुख यांना ५ जून रोजी पहिले समन्स पाठवले होते.

मात्र त्यांनी वकिलामार्फत कारण पुढे करून ईडीकडून वेळ मागितला होता. मात्र देशमुख हे वेळ देऊन ही ईडीच्या चौकशीला हजर झाले नव्हते. दरम्यान ईडीने एका पाठोपाठ एक असे चार महिन्यात पाच समन्स देशमुख यांना पाठवले होते. अखेर १ नोव्हेंबर रोजी अनिल देशमुख ईडी कार्यलयात सकाळी ११ वाजता दाखल झाले असता तब्बल १२ तास चौकशी नंतर त्यांना ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली आहे

.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    माझा स्टॅन स्वामी होऊ नये, सचिन वाझेचं कोर्टात वक्तव्य

    August 31st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveउद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया टॉवरजवळ कारमध्ये ठेवण्यात आलेली स्फोटकं आणि याच कारचा मालक मनसुख हि...

    भाजपाची ५ राज्यात निवडणूक प्रभारींची घोषणा

    September 8th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveभारतीय जनता पक्षाने पुढील वर्षी होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. पक्षाने ...

    ….. ते सहा प्रवासी पॉसिटीव्ह

    December 1st, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveज्या देशात कोरोनाचे रुग्ण जास्ती आहे तेथून आलेले ६ प्रवासी पॉसिटीव्ह आले आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाने बु...