1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

‘वसुली प्रकरणात अनिल देशमुख फसवले गेले’

Spread the love

प्रकाश आंबेडकर यांचा दावा

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना १०० कोटी वसुली प्रकरणात फसवल्याचं दिसत आहे. माझी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना विनंती आहे की, त्यांनी कुणाला तरी वाचवण्यासाठी स्वत:चा बळी देऊ नये. त्यांनी गोळा केलेले पैसे कुणाला नेऊन दिले हे त्यांनी सांगावं. त्यांनी कायद्याला सहकार्य केले तर ते माफीचे साक्षीदार होऊ शकतात, असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर
यांनी केला.

उच्च न्यायालयाने अनिल देशमुखांना 12 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. त्यांच्या १०० कोटी वसुली प्रकरणावरुन प्रकाश आंबेडकरांनी हा दावा केला आहे. नागपूर येथील रविभवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ”या प्रकरणात दाखवलं एक जातय आणि करतयं दूसरचं, असा प्रकार सुरु आहे. आता हा प्रकार थांबवला पाहिजे, असं मला वाटतय, अन्यथा राज्यपालांनी यात लक्ष घालून योग्य तो निर्णय घ्यावा,” अशी मागणी आम्ही करणार आहोत, अशी भूमिकाही प्रकाश आंबेडकरांनी घेतली आहे.

”अनिल देशमुख या प्रकरणात फसले गेले आहेत, कलेक्शन झाले असल्याची माहिती विभागाकडून मिळते. पण चौकशी यंत्रणेला देशमुखांकडे पैसे मिळालेले नाही, मग हे पैसे कोणाकडे गेले, वसुलीतून जे पैसे जमा झाले, ते कोणाकडे गेले, याचा खुलासा अनिल देशमुखांनी करायला हवा. त्यांनी कायद्याला सहकार्य केल्यास, ते माफीचा साक्षीदार होऊ शकतात आणि त्यांची सुटका होऊ शकते. १०० कोटी वसुली प्रकरणात मोहरे समोर येत आहेत; पण मुख्य वजीर आणि राजा समोर येत नाही. पोलीस यंत्रणाही त्यांना समोर आणत नाही. त्यामुळे राज्यपालांनी यात लक्ष घालणे गरजेचे आहे,” असे प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    व्हॉट्सॲप भारतीय न्यायव्यवस्थेमधील कायद्याला विरोध क...

    October 23rd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveव्हॉट्सॲपची मालकी असलेल्या फेसबूकने केंद्र सरकारच्या नव्या आयटी नियमांच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात ध...

    पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा भाजप नेत्याकडून ‘दलित पोस...

    October 12th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveपंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांना भाजप नेत्याने दलित पोस्टर बॉय म्हटले आहे. एका दलित युवकाची जमाव...

    “भीती आहे, पंतप्रधान या पुलाचे उद्घाटनही करतील...

    January 19th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनियंत्रण रेषेजवळ (LAC) लडाखमधील पँगॉन्ग त्सो सरोवरावर चीन पूल बांधत असल्याच्या वृत्तावरून काँग्रेस नेते राह...