1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

नागपुरात शिकाऊ महिला डॉक्टरवर गोळीबाराचा प्रयत्न

thumbnail-thefreemedia
Spread the love

नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्‍या (मेडिकल) ई लायब्ररीजवळ शिकाऊ (इंटर्न) महिला डॉक्टरवर गोळीबाराचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एकतर्फी प्रेमातून सोशल मीडियावर मैत्री झालेल्या मित्राने महिलेवर गोळीबाराचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यातून पीडिता बचावली असल्याचे समजते.

गोळी बंदुकीतच अडकली, मोठा अनर्थ टळला

सोमवारी रात्रीच्या सुमारास नागपुरातील मेडिकलच्या अधिष्ठाता इमारतीच्या शेजारी असलेल्या ई लायब्ररीजवळ हा प्रकार घडल्याची माहिती आहे. संबंधित शिकावू महिला डॉक्टर गेल्या काही दिवसांपासून बोलत नसल्याच्‍या रागातून संशयित विकी चकोले याने तिला भेटण्यासाठी मेडिकलमधील ई-लायब्ररीजवळ बोलावले.आरोपी आणि पीडिता हे दोघे जण बोलत असताना अचानक त्यांच्यात वादावादी झाली. त्यावरुन काही कळण्याच्या आतच आरोपीने खिशातून बंदूक काढली. ती तरुणीवर रोखली. त्याने बंदुकीचा ट्रिगरही दाबला होता. मात्र सुदैवाने गोळी बंदुकीतच अडकल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

शिकावू महिला डॉक्टरने आरडाओरडा केला, जवळपास असलेल्या इतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या दिशेने धाव घेतली. संशयित घटनास्‍थळावरुन पसार झाला. एकतर्फी प्रेमातून तरुणाने महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. दरम्यान, या प्रकरणी नागपुरातील अजनी पोलीस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजनी पोलीस पुढील तपास करीत आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    नागपुरात आंतरराष्ट्रीय महिला दिनी विविध कार्यक्रमांच...

    March 5th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर: राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर यांच्या वतीन...

    वर्धा जिल्ह्यातील कदम हॉस्पिटल परिसरात अर्भकांच्या १...

    January 14th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveआर्वी – अर्भकांच्या ११ कवट्या आणि ५२ हाडे वर्धा जिल्ह्यात आर्वीच्या कदम हॉस्पिटल परिसरात आढळल्यामुळे एकच खळ...

    हवेत उडणारी बस नागपुरात चालविण्याचं स्वप्न; गडकरी

    March 4th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर: हवेत उडणारी बस नागपुरात चालविण्याचं माझं स्वप्न आहे. त्याची तयारी सुरू करा मी त्यासाठी पैसे आणतो. त...