1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

विदर्भातील बड्या नेत्याची भाजपला सोडचिठ्ठी

Spread the love

पक्षावर नाराज असलेले विदर्भातील भाजपचे दिग्गज नेते रविंद्र भोयर (छोटू) यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. रविंद्र भोयर गेल्या काही दिवसांपासून भाजपवर नाराज होते. रविंद्र भोयर यांनी सोमवारी सकाळी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तसेच रविंद्र भोयर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. 34 वर्षांपासून भाजपसाठी झटत आलो. पण त्याच भाजपमध्ये माझा छळ करण्यात आला, मला दाबण्यात आल्यामुळेच पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे भोयर यांनी सांगितले.

भोयर भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर म्हणाले की, भाजपसोबत 34 वर्षे काम केले. तो पक्ष सोडताना मनात वेदना होत आहेत. पण दिवस-रात्र ज्या भाजपला वाढवण्यासाठी काम केले, अनेक नवीन लोकांना पक्षात आणले, त्याच भाजपमध्ये माझा छळ करण्यात आला. मला दाबण्यात आल्यामुळेच पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मी आजच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. काँग्रेसकडून अद्यापही विधानपरिषदेच्या उमेदवारीसाठी कुठलाही शब्द देण्यात आलेला नसल्याचे भोयर यांनी सांगितले.

मी भाजपकडे विधान परिषदेची उमेदवारी मागितली होती. मला प्रत्येक वेळेला चंद्रशेखर बावनकुळे यांनी मी या निवडणुकीत उभा राहणार नसल्याचे सांगितले होते. पण नेमके उलट झाले. मला उमेदवारी नाकारण्यात आली. बावनकुळे यांना कामठी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारताना काय कारणे होती, की त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आणि आज ती सर्व कारणे नाहीशी झाली आहेत का? याचे स्पष्टीकरण भाजप नेतृत्वाने दिले पाहिजे. भाजपकडे या मतदारसंघात मोठी आघाडी असल्याचे म्हटले जाते. पण 14 डिसेंबरला मतमोजणी होताना भाजपकडे जेवढी आघाडी आहे तेवढ्याच मतांनी भाजप पराभूत झालेला पाहायला मिळेल. मला या निवडणुकीत भाजपमधील एक मोठा गट निश्चितपणे साथ देणार असल्याचेही भोयर म्हणाले.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    Union Minister post from Shinde group

    July 2nd, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: महाविकास आघाडी सरकार (mva government) पाडल्यानंतर आता राज्यात शिंदे सरकार (shinde government) आले आ...

    मनी लाँड्रिंग प्रकरणी अनिल देशमुखांच्या जामिनावर उच्...

    April 8th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई : ईडीने पुन्हा एकदा मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्...

    विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी यांना मिळाली उमेदवारी&#...

    November 20th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveराज्यातील विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणुका होणार आहे. भाजपकडून पाच जागांसाठी उमेदवारांच्या नावाची घो...