1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

बिल गेट्स यांच्या मुलीने घोडेस्वाराशी बांधली लगीनगाठ

Spread the love

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी ओळख असणाऱ्या अब्जाधीश बिल गेट्स यांची मोठी मुलगी जेनिफर गेट्स ही विवाहबद्ध झाली आहे. मिस्रचे घोडस्वार नायल नासरशी जेनिफर विवाहबद्ध झाली आहे. यांचा लग्नसोहळा न्यूयॉर्कच्या वेस्टचेस्टर येथे नुकताच पार पडला. परंतु, या लग्नाची माहिती गुप्त ठेवण्यात आली होती. नॉर्थ यॉर्कमधील नॉर्थ सालेममध्ये 142 एकरच्या मालमत्तेच्या बागेत हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. बिल गेट्सच्या मुलीच्या लग्नात सुमारे 300 पाहुणे उपस्थित होते. सध्या सोशल मीडियावर या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत.

2017 सालापासून जेनिफर आणि नायल हे एकमेकांना डेट करत होते. दोघांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून पदवी पूर्ण केली. दरम्यान, 2020 साली या दोघांनी त्यांच्या साखरपुड्याची घोषणा केली होती. विशेष म्हणजे, जेनिफर ख्रिश्चन धर्माचा आहे. तर, नायल हा मुस्लिम आहे.

जेनिफरने तिच्या लग्नाच्या खास दिवशी कस्टम वेरा फुल स्लीव्ह वेरा वांग गाऊन परिधान केला होता. जेनिफरच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी तिला नऊ वधू-वरांनी मिळून तयार केले होते. तर नयालने या लग्नात पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि बॉटी असलेला काळा टक्सिडो परिधान केल्याचे सोशल मीडियावरील फोटोमध्ये दिसत आहे. फक्त नातेवाईकांना आणि मित्रांना रिसेप्शनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी या रिसेप्शनमध्ये अब्जाधीश मायकेल ब्लूमबर्गची मुलगी जॉर्जिना ब्लूमबर्ग देखील दिसली. जेनिसर आणि नायल यांच्या विवाहाची अनेकांना उत्सुकता होती. पण, फारच गुप्तता बाळगून विवाह सोहळा पार पडल्यामुळे अनेकजण निराश झाले आहेत.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    पंतप्रधान नरेंद्र मोदी, नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रु...

    July 14th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरध्वनीवरून नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांच्याबरोबर चर्चा ...

    200 दशलक्ष वर्ष जुन्या डायनासोरच्या पायाचे ठसे सापडले

    January 4th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveवेल्समधील समुद्रकिनाऱ्यावर 200 दशलक्ष वर्षांपूर्वीच्या डायनासोरच्या पायाचे ठसे सापडले आहेत. यूकेच्या नॅचरल ...

    सुमी ओब्लास्टमधील राज्य सीमा युक्रेनच्या ताब्यात

    March 4th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveकीव: युक्रेनची राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण परिषद (एनएसडीसी) ओलेक्सी डॅनिलोव्ह यांनी गुरुवारी युक्रेनचे सश...