1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

एम्स रूग्णालयातील कोट्यवधीचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर

aiims
Spread the love

देशभरातील नामांकित रुग्णालय म्हणून ओळख असलेलं याशिवाय राजकीय नेत्यांपासून प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व ज्या रुग्णालयात उपचार घेतात. त्या रुग्णालयातील भ्रष्टाचाराचं प्रकरण चव्हाट्यावर आले आहे. हे प्रकरण नवी दिल्लीतील एम्स (AIIMS) रुग्णालयातील राजेंद्र प्रसाद आय सेंटर मधील आहे. प्राथमिक तपासानंतर दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. याशिवाय हे प्रकरण इकोनॉमिक ऑफेंस विंगला रेफर करण्यात आलं आहे. या शिवाय या प्रकरणात एफआयआरदेखील दाखल करण्यात आलं आहे. एम्सकडून याची पुष्टी केली असली तरी अद्याप प्रशासनाकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. यापूर्वी एम्स ट्रॉमा सेंटरमधून भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरण समोर आलं होतं.

प्राप्त माहितीनुसार, आरपी सेंटरच्या जनरल स्टोअरशी संबंधित हे प्रकरण आहे. मेडिकल वस्तुंच्या खरेदीमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तब्बल 7 ते 8 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत विभागाने ऑडिटदेखील केलं होतं आणि जेव्हा याचा खुलासा झाला तेव्हा एम्स प्रशासनाने तपास सुरू केला. 19 ऑगस्ट रोजी येथे काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांनी निलंबित करण्यात आलं. याशिवाय अन्य स्टाफला ट्रान्सफर करण्यात आलं.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    जम्मूमध्ये दहशतवादी हल्ला; 2 जवान शहीद, 12 जखमीस

    December 14th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveश्रीनगरमधील पंथा चौक परिसरात झेवानजवळ दहशतवाद्यांनी सोमवारी जम्मूमध्ये पोलिसांच्या वाहनावर गोळीबार केला. दह...

    ड्रग्ज प्रकरणांवर सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य

    October 11th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी शुक्रवारी क्रूझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी अटकेत असलेला बॉलिवूड अभिनेता शाहरूख ख...

    मेघालायामध्ये प्रवाशांनी भरलेली बस नदीत खाली कोसळून ...

    September 30th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveमेघालायामध्ये प्रवाशांनी भरलेली बस नदीत खाली कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला ...