1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

भाजपला राज्यात युतीसाठी नवा मित्र मिळणार; ‘ही’ संघटना कमळ फुलवणार

Spread the love

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपविरोधी भूमिकेसाठी आग्रही असलेले मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, यांनी आगामी निवडणुकीसाठी चक्क भाजपसोबत युती हाच पर्याय असल्याचं म्हटलं आहे. मराठा सेवा संघाच्या 32 व्या वर्धापन दिनानिमित्त लिहिलेल्या लेखात पुरुषोत्तम खेडेकर यांनी ही भूमिका मांडली. त्यामुळे भाजपला आता राज्यात नवा मित्र मिळणार असून ‘मराठा सेवा संघ’ लवकरच कमळ फुलवणार असल्याचे संकेत मिळत आहे.

संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांच्या पत्नी रेखा खेडेकर या 15 वर्ष भारतीय जनता पक्षाच्या बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदारसंघातून आमदार होत्या. त्यामुळे अनेक मुद्यांवर पुरुषोत्तम खेडेकर यांची भूमिका भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात दिसत असली तरी त्यांचा भाजपसोबत नेहमीच घरोबा राहिलाय. पुरुषोत्तम खेडेकर यांनी भारतीय जनता पक्षाला युती करण्यासाठी दिलेल्या या निमंत्रणाला भाजपकडून कसा प्रतिसाद मिळतो हे पहाणं महत्त्वाच असेल.

राजकारणात शिवसेना-काँग्रेस हे कट्टर विरोधी विचारसरणीचे पक्ष एकत्र येऊ शकतात मग इतरांना का येऊ नये? काँग्रेस-राष्ट्रवादी जर संभाजी ब्रिगेडला गृहित धरणार असेल आणि केवळ संभाजी ब्रिगेडच्या नावाचा स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी वापर करत असेल संभाजी ब्रिगेडला काही राजकीय तडजोडी करून वेगळा पर्याय शोधावा लागेल. किमान समान कार्यक्रमाप्रमाणे भाजपासोबत युती होऊ शकते असं संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी सांगितले आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    जनतेच्या मनात पोलिसांबद्दल विश्वास निर्माण करा; गृहम...

    October 13th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसर्वसामान्य जनतेच्या मनात पोलिसांची चांगली प्रतिमा निर्माण करणे तसेच यंत्रणेबद्दल विश्वास निर्माण करणे ही आ...

    उद्या शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार?

    August 9th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveइतक्या मंत्र्यांचा होणार शपथविधी मुंबई : शिंदे आणि भाजप सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी बातमी समोर आ...

    मुख्यमंत्र्याशी आज भेटणार शरद पवार; ईडी चौकशीच्या मु...

    September 9th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्यातील महाविकास आघाडी सरकारचे जनक शरद पवार आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. मुख्यमंत्र्या...