1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

नागपूरऐवजी मुंबईत होणार विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन !

Spread the love

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचे सावट, विधान परिषद निवडणूक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे लांबणीवर गेले आहे. येत्या डिसेंबर अखेरीस अधिवेशन होणार आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशन प्रथा-परंपरेप्रमाणे नागपूरला होत असते, परंतु मुख्यमंत्र्यांची तब्येत लक्षात घेता हे अधिवेशन मुंबईतच होण्याची चिन्हे आहेत. या आठवड्यात तसा निर्णय सरकार व प्रशासन घेणार आहे. विशेष म्हणजे नागपूरलाच अधिवेशन व्हावे यासाठी भाजप नेते आग्रही आहेत. तर दुसरीकडे मुंबईतच हे अधिवेशन व्हावे यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची जुलैमध्ये सांगता होताना हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर 2021 रोजी नागपूर येथे होईल, असे घोषित करण्यात आले होते. पण, नियोजित अधिवेशनाला 15 दिवसांचा कालावधी शिल्लक असताना अद्याप मंत्रालय पातळीवर अधिवेशनाच्या तयारीची हालचाल नाही. अधिवेशनाच्या महिनाभर आधी कामकाज सल्लागार समितीची बैठक होते. अधिवेशनाला जेमतेम 15 दिवस शिल्लक असताना सल्लागार समितीच्या बैठकीचा पत्ता नाही. तसेच शस्त्रक्रिया झाल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरेंना डिस्चार्ज अद्याप मिळालेले नसल्यामुळे ही सगळी परिस्थिती पाहता महाविकास आघाडी सरकारच्या प्रमुख मंत्र्यांनी हे अधिवेशन मुंबईत घ्याव, असे एकमताने ठरवले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे या आठवड्यात होणाऱ्या कॅबिनेट बैठकीमध्ये या हिवाळी अधिवेशनाचा प्रस्ताव बैठकी ठेवतील. यानंतर मुंबईत हे अधिवेशन व्हावे यावर चर्चा होणार आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार हिवाळी अधिवेशन 14 ते 24 , 17 ते 26 , 20 ते 29 डिसेंबर या कालावधीत घेण्यासाठी महाविकास आघाडी सरकार हे प्रस्ताव ठेवणार आहे. नये बैठकीनंतर कामकाज सल्लागार समितीची बैठक होईल आणि मग मुंबईतच या हिवाळी अधिवेशनाचा नियोजन करण्यात येईल.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    “किरीट सोमैया अमरावतीला येऊन काय करणार…....

    November 17th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveत्रिपुरातील घटनेमुळे महाराष्ट्रातही हिंसाचाराचे दृश्य पहिला मिळाले. अमरावती गेल्या काही दिवसांपासून हिंसाचा...

    15 दिवस बंद राहणार लोहगाव विमानतळीवरील उड्डाणे

    October 6th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveपुणे येथील लोहगाव विमानतळावरील उड्डाणे 16 ऑक्टोबरपासून 15 दिवस बंद राहणार आहेत. ही उड्डाणे विमानतळाच्या धाव...

    समुद्रपूर नगर पचांयतीच्या पाच उमेदवारांचे भवितव्य उद...

    January 17th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveवर्धा: समुद्रपूर तालुक्यातील नगर पंचायतीच्या सर्व प्रभागातील म्हणजे १ ते १७ वार्डातील निवडणुका मागील टप्प्य...