1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

चरणजीत सिंह चन्नी आज घेणार पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

charanjit singh
Spread the love

पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटला असून कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदावर चरणजीत सिंह चन्नी यांची निवड झाली आहे. वयाच्या ४८ व्या वर्षी चन्नी पंजाबचे मुख्यमंत्री होणार आहेत. मुख्यमंत्रीपदासाठी अनेक दिग्गजांची नावे पुढे आलेली मात्र या सर्व दावेदारांना मागे सारत चन्नी मुख्यमंत्री होत आहेत. चन्नी यांच्या माध्यमातून पंजाबला पहिल्यांदाच दलित मुख्यमंत्री लाभणार आहे.

आज ११ वाजता चरणजीत सिंह चन्नी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. येत्या ६ महिन्यासाठी चन्नी पंजाबचे मुख्यमंत्री असणार आहेत. त्यांनतर तेथे निवडणुका होणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसला पुन्हा सत्तेत आणण्याचं आव्हान चन्नी यांच्यापुढे असणार आहे.

कोण आहेत चन्नी?

चरणजीत सिंह चन्नी अमरिंदर सिंग सरकारमध्ये तंत्रशिक्षण आणि पर्यटन मंत्री होते. ते चमकौर विधानसभा मतदारसंघातून ३ वेळा आमदार झाले आहेत. ते पंजाब विधानसभेत विरोधी पक्षनेते राहिले आहेत.पंजाब काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांचे निकटवर्तीय अशी चन्नी यांची ओळख आहे. अमरिंदर सिंग यांच्या प्रमाणात कमी प्रसिद्ध असणारा चेहरा देऊन काॅंग्रेसने ग्रामीण मतदारांना आकर्षीत करण्याचा प्रयत्न केला आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    शिक्षकांना जुनी पेन्शनकरिता शासनस्तरावर पाठपुरावा कर...

    October 18th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveशिक्षकांसाठी दिलासादायक बातमी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना जुनी पेन्शन लागू व्हावी ही रास्त मागणी अस...

    कोंबडी… बेडूक चाटू …असे नारायण राणे यांच्या प्रकरणात...

    August 25th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केलेल्या आक्षेपार्ह्य वक्तव्या प्रकरणीचा मुद्द...

    देशातील प्रत्येक जिल्हा ऑक्सिजनदृष्ट्या स्वयंपूर्ण –...

    October 8th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveकोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी देशाने अल्पावधीत आरोग्य सुविधांचा मोठा विस्तार केला. हे कार्य देशाची क्षम...