1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

प्रतिज्ञापत्रात गुन्ह्यांची माहिती लपवल्या प्रकरणी फडणवीसांविरोधात आरोपपत्र !

thumbnail-thefreemedia
Spread the love

राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने शनिवारी आरोप निश्चित केले. परंतु, फडणवीस यांच्या बकिलांनी हे आरोप मान्य नसल्याची भूमिका न्यायालयात मांडली. या प्रकरणातील तक्रारदार ॲड. सतीश उके यांनी पुण्यात पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

२०१४ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत फडणवीस यांनी दक्षिण-पश्चिम नागपूरमधून निवडणूक लढवली होती. त्यावेळी नामांकनपपत्र दाखल करताना प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यात त्यांनी त्यांच्याविरुद्ध प्रलंबित असलेल्या दोन फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवली होती.

याप्रकरणी ॲड, सतीश उके यांनी निवडणूक निर्णय अधिकारी व न्यायालयाकडे तक्रार केली होती. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले होते. सर्वोच्च न्यायालयाने ॲड. सतीश उके यांची तक्रार योग्य असल्याचा निर्वाळा दिला होता. तसेच हे प्रकरण नागपुरातील कनिष्ठ न्यायालयात चालवण्यास सांगितले होते. यानंतर फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयात पुर्विलोकन याचिका दाखल केली होती. ती नंतर फेटाळून लावण्यात आली. यानंतर त्यांनी जामीन प्राप्त केला.

प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी व्ही. एम. देशमुख यांच्या न्यायालयात शनिवारी या प्रकरणावर सुनावणी झाली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध ‘चार्ज फ्रेम’ करण्यात आले आहे. हे आरोप कलम १२५ नुसार मान्य आहेत का, अशी विचारणा न्यायाधीशांनी फडणवीस यांचे वकील ॲड. उदय डबले यांना केली. यावर त्यांनी हा गुन्हा मान्य नसल्याचे म्हटले. देवेंद्र फडणवीस यांना न्यायालयात हजर राहण्यापासून सवलत द्यावी, अशी विनंती न्यायालयाला या पूर्वी करण्यात आली होती. न्यायालयाने ही विनंती मंजूरदेखील केली होती. त्यामुळे आरोपीच्या गैरहजेरीत आरोपनिश्चित केले जाऊ शकतात का असा प्रश्न न्यायालया समोर होता. या प्रकरणावर पुढील सुनावणी १३ डिसेंबरला होणार आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    MAHARASHTRA FLOOD I उपमुख्यमंत्र्यांनी केली अतिवृष्ट...

    July 19th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: विदर्भात यंदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, बुलढाणा,...

    अधिवेशनात घुसलाय कोरोना; मंत्र्यासह ३५ जण बाधित

    December 27th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु असून अनेक मुद्द्यावरून सभागृहात गोंधळ झाल्याचं दिसून आलं. देशात ओमिक्रॉनचं संक...

    आता अशोक चव्हाण, अमित देशमुख, अर्जुन खोतकारांच्या मा...

    November 12th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्याचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सरकार राज्याच्या सत्तेवर आले, तेव्हापासून राज्यातील घोटाळेब...