1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

रामदास कदम यांचा पत्ता कट; शिवसेनेकडून ‘या’ दोन नेत्यांना उमेदवारी

ramdas kadam
Spread the love

शिवसेनेने विधान परिषदेच्या दोन जागांसाठी शिवसेनेने उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. ऑडिओ क्लिप प्रकरणामुळे कदम यांचा पत्ता कट करण्यात आल्याचं बोललं जात आहे.

मुंबई महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून माजी आमदार सुनील शिंदे तर अकोला-बुलढाणा-वाशीम मतदारसंघातून आमदार गोपिकिशन बाजोरिया यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या ठिकाणी त्यांची भाजपच्या वसंत खंडेलवाल यांच्याशी लढत होणार आहे. ही लढत अत्यंत चुरशीची होणार असल्याने त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सुनील शिंदे हे वरळी मतदारसंघातील शिवसेनेचे माजी आमदार आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुनील शिंदे यांनी त्यांच्यासाठी आपली जागा सोडली होती. त्यानंतर सुनील शिंदे यांनी संघटनात्मक कामात स्वत:ला झोकून दिलं होतं. मात्र, आता विधान परिषदेच्या दोन जागा रिक्त झाल्याने मुंबईतून सुनील शिंदे यांना संधी देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेकडे अधिक नगरसेवक असल्याने भाजप एक जागा लढवणार आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    राज्यात कोरोनाचा उद्रेक; निर्बंध नको असतील तर, शिस्त...

    June 3rd, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई: राज्यात कोविड पुन्हा डोके वर काढत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोविड बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे...

    राज्यात दोन डोस घेतलेल्यांची संख्या दोन कोटीच्या पुढ...

    September 21st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्यात कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन डोस घेतलेल्यांची संख्या, आता 2 कोटींच्या पुढे गेली असून, या बाबत महारा...

    शिंदेच्या मंत्रिमंडळात ‘या’ १८ जणांना स्थान

    August 9th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात कोण कोण असणार हे आता निश्चित झालं आहे. छोटेखानी मंत्रिम...