1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

खाणक्षेत्रासाठी योग्य धोरणे आखली नाहीत तर देशाचा विकास अशक्य; अमित शाह

ammit shah-thefreemedia
Spread the love

नवी दिल्ली: केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली येथे 6व्या ‘खाणी आणि खनिजांवरील राष्ट्रीय परिषदेत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला केंद्रीय खाण, कोळसा आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी आणि केंद्रीय खाण, कोळसा आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

देशाच्या आर्थिक विकासात खाणी, खनिजे आणि कोळसा क्षेत्राचे मोठे योगदान आहे. खाणी आणि खनिजांसाठी योग्य धोरणांशिवाय कोणत्याही देशाच्या विकासाची कल्पना करता येत नाही, असे प्रतिपादन अमित शाह यांनी यावेळी केले. सध्याच्या सरकारने अमलात आणलेल्या सुधारणांमुळे कोळसा खाणी वाटपात खोलवर रुतून असलेला भ्रष्टाचार समूळ नष्ट केला आहे, असे शाह म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खाण क्षेत्रात सुधारणांना सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.केंद्र सरकारने या मध्ये पारदर्शकता आणली, या क्षेत्रातले अडथळे दूर केले,आणि अनेक बाजूनी हे खाजगी क्षेत्रासाठी खुले केल्याचे त्यांनी सांगितले. पर्यटन आणि हवाई क्षेत्रानंतर सर्वात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणारे क्षेत्र म्हणून खाण आणि खनिज क्षेत्राचे नाव असल्याचे त्यांनी सांगितले.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    “पीएम केअर फंडमध्ये जमा झालेला पैसा कुठे जातोय...

    October 14th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमाजी न्यायमूर्तीं लोकूर यांनी व्यक्त केली चिंता पीएम केअर फंडमध्ये जमा पैसा कुठे जातोय हे आम्हाला माहिती ना...

    मोदी पंतप्रधान झाल्यापासून महिलांची सैन्यातील भूमिका...

    November 18th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the love‘नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान झाल्यापासून भारतीय सैन्यातील महिलांची भूमिका वाढली आहे’ असे प्रतिपादन भा...

    देशात वीज टंचाई निर्माण होण्याची भीती

    October 12th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशात गेल्या काही दिवसांपासून कोळशाच्या संभाव्य टंचाईची मोठी चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे कोळशाचा पुरवठा राज...