1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

फडणवीस तुम्ही आताच बॉम्ब फोडून टाका, नाहीतर…. संजय राऊत यांचा इशारा

Fadnavis
Spread the love

महाराष्ट्रात सध्या ड्रग्ज प्रकरणावरुन भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सरकार मध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. यात महत्वाचे माजी मुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांच्यात एकमेकांवर टीका-टिप्पणी होत आहे. या दरम्यान फडणवीस यांनी दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असल्याचे सांगितले असल्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांना इशारा दिला आहे. फडणवीसांनी बॉम्ब लगेच फोडावा, अन्यथा तुमच्या हातातच फुटेल, असे राऊत यांनी म्हंटले आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद सोडला. यावेळी ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लवंगी फटाका लावला आहे, मी दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार आहे, असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे. त्यांना एवढंच सांगणे आहे की, फडणवीस बॉम्ब फोडायला उशीर का लावता? दिवाळीनंतर फोडण्याची वाट पाहू नका आताच फोडून टाका. नाहीतर तो तुमच्याच हातात फुटेल.

कोणाकडे बॉम्ब असेल असे राजकीय नेते सांगत असतील तर ते स्वत:च्या जीवाशी खेळत आहेत. ताबडतोब त्यांनी एक तर बॉम्ब फेकला पाहिजे किंवा तो संपवला पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही राजकीय नेत्याचे अंडरवर्ल्डशीसंबंध नाही. मी भाजपामधील १० पदाधिकारी देऊ शकतो. जे तुरुंगांमधून शिक्षा भोगून बाहेर आहेत आणि आज पक्षाचे पदाधिकारी आहेत, असेही संजय राऊत म्हणाले.

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    2035 पर्यंत नेट झिरो कार्बन कंपनी बनण्याचं उद्दिष्ट;...

    September 3rd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveभारतातील हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढ हा सध्या जगापुढचा सर्वांत महत्त्वाचा प्रश्न असून, त्याचे दुष्परिणा...

    उपमुख्यमंत्र्यांनी दिले एस टी महामंडळास 500 कोटी; कर...

    September 2nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्यातील लालपरीचे चाक वेतनाअभावी थांबलेले असल्याने मागील ब-याच महिन्यापासून कर्मचारी हवालदील झाले होते. एस...

    इंदापूर शिक्षक पतसंस्थेत कवयित्री निर्मला मचाले-पवार...

    September 13th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveइंदापूर;इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सणसर या अध्यक्ष चषक पुरस्कार प्राप्त शाळेच्या आदर्श ...