1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

आर्यन प्रकरणातील मुख्य साक्षीदार, फरारी किरण गोसावीला पुण्यात अटक

aryan-khan-drugs-case
Spread the love

आर्यन खान प्रकरणातील अमली पदार्थ विरोधी विभागाचा मुख्य साक्षीदार आणि फरारी घोषित केलेला आरोपी किरण गोसावी याला पुणे पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले असून त्याला फरासखाना पोलीस स्टेशन मध्ये नेले गेले असल्याचे वृत्त आहे. किरण गोसावी याला पोलिसांनी २०१८ सालच्या फसवणूक प्रकरणात अटक केली असल्याचे सांगितले गेले आहे. या फसवणूक प्रकरणात गोसावी फरारी झाला होता आणि २०१९ मध्ये पुणे पोलिसांनी त्याला वाँटेड घोषित केले होते.

एनसीबीने मुंबई गोवा क्रुझवरून शाहरुखपुत्र आर्यन खान आणि अन्य आठ जणांना ताब्यात घेतले होते तेव्हा हा किरण गोसावी एनसीबीच्या कार्यालयात आर्यन बरोबर सेल्फी घेताना दिसला होता. किरण या प्रकरणात एनसीबीच्या मुख्य साक्षीदार आहे. मात्र याचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल याने आर्यन प्रकरणात २५ कोटींची लाच मागितल्याचा एक व्हिडीओ व्हायरल केल्यानंतर एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात अनेक आरोप प्रत्यारोप लावले गेले होते. एनसीबी कार्यालयात किरण गोसावी साक्षीदार म्हणून हजर होता पण त्यानंतर तो गायब झाल्यावर पुणे पोलीसानी तो पळून परदेशी जाऊ नये म्हणून त्याच्या विरोधात लुक आउट नोटीस जारी केली होती.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    तिसरी लाट लक्षात घेता आरोग्य विभागाने सूक्ष्म नियोजन...

    August 31st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्यात कोरोनाची तिसरी लाट 15 ऑक्टोबरपर्यंत डोकं वर काढू शकेल असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. याचा ...

    दिवाळीनंतर देवेंद्र फडणवीसांनी फोडला बॉम्ब

    November 9th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या जमिनी नवाब मलिक यांनी खरेदी केल्याचा आरोप क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबी विरु...

    चैत्यभूमीवर पोलिसांनी अनुयायांना प्रवेश नाकारल्यामुळ...

    December 6th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveमहापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातील अनुयायी मुंबईतील चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासा...