1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

हाच तो, अफगाणिस्थानातून बाहेर पडणारा शेवटचा अमेरिकी सैनिक

soldier
Spread the love

तालिबानने अफगाणिस्थानचा कब्जा घेतल्यावर अमेरिकन सैनिकांनी दिलेल्या मुदतीच्या आधीच अफगाणिस्थान सोडला असून शेवटची सैन्य तुकडी रात्री १२ वाजता देशाबाहेर पडल्याचे पेंटागॉनने प्रथम जाहीर केले आहे. त्यानंतर राष्ट्रपती जो बायडेन यांनी मोठे विधान करताना अफगाणिस्थान मधील २० वर्षाचे अमेरिकी सैनिकांचे अस्तित्व संपल्याचे जाहीर केले आहे.

पेंटागॉनने अमेरिकी सैन्य वापसी पूर्ण झाल्याचे जाहीर करून शेवटचा अमेरिकी सैनिक बाहेर पडत असतानाचा फोटो प्रसिद्ध केला आहे. हा शेवटचा सैनिक म्हणजे मेजर जनरल क्रिस डोन्ह्यू हे आहेत. ते सर्वात शेवटी सी १७ विमानात चढले. त्यांच्याकडे काबुलच्या अमेरिकी मिशनच्या अंताचे प्रतिक म्हणून पाहिले जात आहे.

५२ वर्षीय क्रिस यांना मध्यपूर्व आणि उत्तर आफ्रिकी प्रमुख सैनिकी अभियानापूर्वी द. कोरिया आणि पनामा येथे तीन दशके सेवा देण्याचा अनुभव आहे. ते दोन स्टार जनरल आहेत आणि विशेष सेना दलांसोबत त्यांनी करियर मधील मोठा काळ काम केले आहे. अफगाणिस्थान, इराक, सिरीया, लिबिया व पूर्व युरोप संचालनाचे समर्थन करताना क्रिस याना १७ वेळा तैनात केले गेले आहे.

अफगाणिस्थान मधून अमेरिकी सैन्य वापसीचे अभियान गेले १७ दिवस सुरु असून इतिहासातील हे सर्वात मोठे एअरलिफ्ट अभियान असल्याचे सांगितले जात आहे. बेजोड साहस आणि संयम ठेऊन ते पार पाडले गेल्याचे पेंटागॉनचे म्हणणे आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    राष्ट्रकुल स्पर्धा : भारताच्या सुधीरची ‘सुवर्ण भरारी’

    August 5th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveपहिल्यांदा भारताच्या खात्यात पॅरा पॉवरलिफ्टिंग स्पर्धेच्या पदकाची कमाई नवी दिल्ली : यंदाच्या राष्ट्रकुल स्प...

    ब्रिटनची राणी एलिझाबेथ II च्या अंत्यसंस्काराची योजना...

    September 4th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveब्रिटनची महाराणी, ९५ वर्षीय एलिझाबेथ (द्वितीय) यांच्या निधनानंतर अंतिम संस्कार योजनेसंदर्भात तयार केलेल्या ...

    अमेरिकेला शह देणारा ‘हा’ नेता होणार इराक...

    October 12th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveइराकमधील सार्वत्रिक निवडणुकीच्या निकाल आता हळू हळू समोर येत आहेत,या निवडणुकीत शिया धर्मगुरू मुक्तादा अल-सदर...