1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

“….असच चालू राहिले तर, हे लोक एक दिवस सावरकरांना राष्ट्रपीता बनवतील”

Veer savarkar
Spread the love

राजनाथ सिंह यांच्यावर ओवैसींची टिका

हिंदुत्वाचे प्रतीक असणाऱ्या वीर सावरकर यांनी महात्मा गांधींच्या सूचनेवरून अंदमान तुरुंगात कैद असताना ब्रिटीशांकडे दया याचिका दाखल केली होती, पण स्वातंत्र्य संग्रामातील त्यांचे योगदान काही विचारसरणीच्या लोकांनी बदनाम केले आणि ते आता सहन केले जाणार नाही, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले. तर, राजनाथ सिंह यांच्या या वक्तव्यावरून एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सडकून टीका केली आहे.

“हे लोक चुकीचा इतिहास मांडत आहेत. हे असेच चालू राहिले तर ते महात्मा गांधींना काढून ज्या सावरकरांवर महात्मा गांधींच्या हत्येचा आरोप होता आणि जस्टिस जीवनलाल कपूर यांच्या चौकशीत त्यांना दोषी ठरवण्यात आले होते, त्या सावरकरांना राष्ट्रपिता बनवती,” अशी टीका असदुद्दीन ओवैसी यांनी राजनाथ सिंह आणि भाजपवर केली आहे.

“सावरकरांच्या विरोधात खूप खोटे बोलले गेले आहे. त्यांनी ब्रिटिश सरकारपुढे अनेक दया याचिका दाखल केल्या हे वारंवार सांगितले गेले. त्यांनी त्यांच्या सुटकेसाठी या याचिका दाखल केल्या नाहीत. सामान्यत: कैद्याला दया याचिका दाखल करण्याचा अधिकार असतो.

तुम्ही दया याचिका दाखल करा, असे महात्मा गांधी म्हणाले होते. गांधींच्या सूचनेवरूनच त्यांनी दया याचिका दाखल केली. आणि महात्मा गांधींनी सावरकरांना सोडण्याचे आवाहन केले होते. गांधीजी ज्या प्रकारे आम्ही शांततेने स्वातंत्र्याची चळवळ चालवत आहोत, सावरकर तेच करतील असे म्हणाले होते,” असे राजनाथ सिंह म्हणाले.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    डेरा सच्चा सौदा’चा राम रहीम यास जन्मठेप

    October 18th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the love31 लाखाचा दंडही भरावा लागणार पंचकुला येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम र...

    Punjab Elections 2022I आपचे मुख्यमंत्री उमेदवार भगवं...

    January 24th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: विधानसभा निवडणूकीत (assembly elections) कोरोना व्हायरस पासून वाचण्यासाठी निवडणूक आयोगाने रैली आणि ज...

    ‘ओमायक्रॉन’ चा एकही रुग्ण अजून भारतात ना...

    November 30th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveसोमवारपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या सत्रात केंद्रीय आरोग्य...