1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

भावना गवळीच्या अडचणीत वाढ; ईडीची मोठी कारवाई

Bhāvanā gavaḷī
Spread the love

वाशीम-यवतमाळच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या संस्थांभोवतीचा सक्तवसुली संचालनालयाचा (ईडीचा) फास आणखीन घट्ट झालाय. गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमध्येच बदल करुन त्याचे कंपनीमध्ये रुपांतर करण्यात आल्याप्रकरणी या कंपनीचे संचालक सईद खान यांना अटक करण्यात आली आहे. ईडीने ही अटक केलीय. सोमवारी रात्री आठच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र ही अटक बेकायदेशीर असल्याचा दावा खान यांच्या वकीलांनी केलाय.

गवळी यांच्या चौकशीहीची शक्यता

सईद खान यांना अटक केल्यानंतर त्यांचे वकील इंद्रापल सिंह यांनी ही अटक बेकायदेशीर असल्याचा दावा केलाय. खान हे ईडीकडून देण्यात आलेल्या सर्व सुचनांचे पालन करण्याबरोबरच तपासात सहकार्य करत असतानाही ही अटक करण्यात आल्याबद्दल सिंह यांनी नाराजी व्यक्त केलीय. या अटकेमुळे गवळी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जातंय. ज्या कंपनीच्या चौकशीसाठी खान यांना अटक करण्यात आलीय त्याच कंपनीमध्ये गवळी या निर्देशक म्हणजेच डायरेक्टर होत्या. त्यामुळे आगामी काळामध्ये गवळी यांची या प्रकरणामध्ये चौकशी केली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मागील काही दिवसांमध्ये गवळी यांच्यासंदर्भातील हे दुसरे प्रकरण आहे ज्यामध्ये ईडीने कारवाई केलीय.

यापूर्वीही गावळींच्या निकटवर्तीयांना ईडीने पाठवलेल्या नोटीस

३० ऑगस्ट रोजी ईडीने वाशीम जिल्हय़ातील रिसोड व इतर ठिकाणच्या गवळी यांच्या संस्थांमध्ये झडती घेतली होती. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी गवळींवर १०० कोटींच्या घोटाळयाचा आरोप केला आहे. या धाड सत्रानंतर गवळी यांच्या दोन निकटवर्तीय सहकाऱ्यांना ईडीसमोर हजर राहण्याची नोटीस पाठवण्यात आलेली. महिला उत्कर्ष प्रतिष्ठानशीसंबंधित दोन व्यक्तींना ईडीने समन्स पाठवले होते. आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी हे समन्स पाठवण्यात आले होते. दोघांनाही ईडीच्या तपास अधिकाऱ्यांसमोर हजर रहावे असं या समन्समध्ये म्हटलं होतं. मात्र या दोन्ही व्यक्तींनी खासगी कारण देत आपल्याला ईडीसमोर हजर राहण्यासाठी १५ दिवसांचा अवधी घ्यावा अशी मागणी ६ सप्टेंबर रोजी केली होती.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    काळया फिती लावून आशा वर्कर करणार पल्स पोलिओ लसीकरण

    February 26th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर: महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडशन (सीआयटीयू) तर्फे २५ तारखेपर्यंत सर्व थकीत मानधन द्या अन्यथा पोलिओ...

    समीर वानखेडेवर पाळत, मुंबई पोलीस विरोधात तक्रार

    October 12th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई एनसीबीचे समीर वानखेडे यांनी आर्यन खान प्रकरणीच्या मुद्द्यावरुन मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. ...

    बंडखोर शिंदेसह १६ जणांच्या आमदारकीवर येणार गंडातर?

    June 24th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई: शिवसेनेची विधी विभागाची एक टीम आता विधानभवनात पोहोचली आहे. १६ आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी...