1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

समीर वानखेडेवर पाळत, मुंबई पोलीस विरोधात तक्रार

Spread the love

मुंबई एनसीबीचे समीर वानखेडे यांनी आर्यन खान प्रकरणीच्या मुद्द्यावरुन मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्यावर गुप्तहेरामार्फत पाळत ठेवल्या जात असल्यावरून महाराष्ट्र पोलीस संचालनालयाकडे त्यांनी याबाबतची तक्रार करत सदर प्रकरणीचे सीसीटीव्ही फूटेजही पाठवल्याचं म्हटलं जात आहे. डीजीपींना दिलेल्या तपशीलानुसार पोलिस अधिकारी आपला सिव्हील ड्रेसमध्ये पाठलाग करत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे.

ड्रग्ज रॅकेटविरोधात समीर वानखेडेंची मोठी मोहिम

किंग खान म्हणून नावाजलेल्या शाहरुख खान याच्या मुलाला म्हणजेच आर्यन खान याला ताब्यात घेण्याचं काम वानखेडे यांनीच केलं होतं. याशिवायही कला जगतातील ड्रग्ज प्रकरण त्यांनी वेळोवेळी उघड केलं आहे. एक शिस्तप्रिय अधिकारी म्हणून समीर वानखेडे यांची ओळख आहे. पण, आता मात्र आर्यन खान प्रकरणाचा तपास सुरु असताना मुंबई पोलिसांकडूनच त्यांच्या कारवाईत अडथळे निर्माण केले जात असल्याचं म्हटलं जात आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणापासून आले होते चर्चेत…

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाला जोडूनच तपास सुरु असणाऱ्या ड्रग्ज प्रकरणी तपास आणि कारवाई दरम्यान वानखेडे प्रकाशझोतात आले होते. त्याचवेळी त्यांची एनसीबीमध्ये एंट्री झाली होती. त्यांच्या हाती महत्त्वाची जबाबदारी सोपवल्यानंतर बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शन उघडकीस आलं होतं.

समीर वानखेडे 2008 बॅचचे अधिकारी असून, एनसीबीमध्ये सेवेत येण्यापूर्वी ते नॅशनल इन्वेस्टिगेशन एजंन्सीमध्ये सेवेत होते. एअर इंटेलिजन्स युनिटसोबतही त्यांनी काम केलं आहे. आतापर्यंत त्यांना अनेकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. अशा परिस्थितीत सुरक्षा पुरवण्याच्या सुविधेला मात्र वानखेडे यांनी नकार दिल्याचंही म्हटलं जातं.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    महाराष्ट्रात मंत्रिमंडळाचा विस्तार I पण एकीकडे सुप्र...

    August 9th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: ३० जुन २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांनी महारष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. उप- मुख्यमंत...

    हिवाळी अधिवेशनात मोठ्या नेत्यांची नावं जाहीर करणार; ...

    October 29th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आरोप करतानाच काही...

    लखीमपूर हिंसाचार; शरद पवारांची संतप्त प्रतिक्रिया

    October 5th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveशेतकऱ्यांसोबत लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचारासंदर्भात देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. काँग्रेस ने...