1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

‘भारताची वाटचाल रशियातील एकाधिकारशाहीच्या दिशेने’; पृथ्वीराज चव्हाणांचा मोदींवर हल्लाबोल

thumbnail-thefreemedia
Spread the love

संस्थात्मक रचना ताब्यात घेऊन मनमानीपद्धतीने काम केले जात आहे. खऱ्या अर्थाने देशात लोकशाही राहिलेली नसून हुकूमशाही व्यवस्थेकडे आपली वाटचाल सुरु झाली आहे, असे चित्र जगात निर्माण झाले आहे. पॅगेसीसच्या माध्यमातून हेरगिरी करून सर्वांची माहिती घेतली जात आहे, हे कोण करतेय याची चौकशी सरकार करत नाही. अशा शब्दात माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाना साधला आहे.

पुढे बोलताना चव्हाण म्हणाले, रशियातील केजीबीचा एक अधिकारी नंतर देशाचा पंतप्रधान झाला त्यानंतर राष्ट्राध्यक्ष झाला आणि आता आयुष्यभर राष्ट्राध्यक्ष बनून रशियात एकाधिकारशाही आणली आहे भारताची वाटचालही रशियाच्या दिशेनेच सुरु आहे.

२३ कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली गेले आहेत. त्यामुळे नागरिकांना दारिद्र्याच्या खाईत लोटणाऱ्या केंद्र सरकारविरोधात ‘मोदी हटाव देश बचाव’ असा नारा आम्ही सायकल रॅलीच्या माध्यमातून देत आहोत. मनमोहनसिंग यांचे सरकार असताना १२४ डॉलर प्रति बॅरलप्रमाणे कच्च्या तेलाचे दर होते. सध्या कच्च्या तेलाचे दर ६० ते ६५ डॉलर प्रती बॅरल असे असतानाही पेट्रोल डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. केंद्र सरकार सामान्य लोकांवर कर लादून स्वतःच्या झोळ्या भरण्याचं काम करत आहे, असा आरोपही चव्हाण यांनी मोदी सरकारवर केला.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचे काम फक्त शरद पवारच कर...

    December 13th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveशिवसेना खासदार संजय राऊत हे सध्या दिल्लीमध्ये आहेत. आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांच्यावर दाखल करण...

    निर्मला सीतारामन यांनी घेतली जागतिक बँकेचे अध्यक्ष ड...

    April 23rd, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveकेंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज वॉशिंग्टन डीसी येथे जागतिक बँकेचे अध्य...

    ‘जैवतंत्रज्ञान स्टार्टअप प्रदर्शन- 2022’...

    June 8th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनवी दिल्‍ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 9 जून रोजी सकाळी साडेदहा वाजता नवी दिल्लीत प्रगती मैदान य...