ओवैसींचा भाजपाला सवाल
भारतात मागील काही दिवसांपासून काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर काश्मिरी पंडितांना देखील आपला प्राण लागला आहे. तर भारतीय जवानही शहीद झाले आहेत. यावरूनच एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. ते एका सभेत बोलत होते.
जम्मू काश्मीरच्या पुँछमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर केलेल्या हल्ल्यातील शहिदांबद्दल बोलताना असदुद्दीन ओवैसी यांनी संताप व्यक्त केला. तसेच भारत आणि पाकिस्तान दरम्यान होणाऱ्या टी-20 सामन्यालाही त्यांनी विरोध केला आहे.
ओवेसी म्हणाले की, ‘काश्मीरमध्ये आमचे नऊ जवान शहीद झाले आहेत आणि भारत 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानसोबत टी 20 मॅच खेळणार, असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. दरम्यान केंद्र शासित प्रदेश असलेल्या काश्मीरमधील हत्या रोखण्यात भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार सपशेल अपयश आलं आहे. तपास यंत्रणा आणि गृहमंत्री काय करतायतं, असा सवालही ओवेसी यांनी उपस्थित केला.