The Free Media

covid-19- thefreemedia

कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर सर्व निर्बंध खुले करण्यात आले. मात्र, चौथी लाट जून महिन्यात येऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञ मंडळी गेल्या महिन्यापासूनच सांगत आहेत.

आता मे महिना सुरू झाल्यावर देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे हा अंदाज खरा ठरणार का? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. देशात गेल्या २४ तासात ३१५७ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. सध्या देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या १९५०० वर पोहोचली आहे.

सर्वाधिक कोरोना रुग्ण राजधानी नवी दिल्लीमध्ये आढळले आहेत. नवी दिल्लीत १४८५, हरियाणामध्ये ४७९, केरळमध्ये ३१४, उत्तर प्रदेशमध्ये २६८ आणि महाराष्ट्रात १६९ करोना रुग्ण आढळले आहेत.

देशातील एकूण कोरोना रुग्णसंख्येपैकी ८६ टक्के रुग्ण या पाच राज्यांमध्ये आढळले आहेत. देशातील गेल्या आठवड्यातील कोरोना आकडेवारीचा विचार करता ४१ टक्के रुग्णांची वाढ नोंदवण्यात आली आहे. मात्र, कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण वाढलेलं नाही ही दिलासादायक बाब आहे.

Share on Social media

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on linkedin
LinkedIn
Share on whatsapp
WhatsApp
Share on email
Email

Related Post

thumbnail-wordpress-thefreemedia

महाराष्ट्र: केमिस्टच्या हत्येचा आरोपी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले, एनआयएने सुरू केला तपास

नागपूर: महाराष्ट्रातील अमरावती येथे 21 जून रोजी गळा चिरून केमिस्टच्या हत्येप्रकरणी एनआयएने तपास सुरू केला आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत आदेश जारी केला आहे.

Read More »
uddhav-thackeray-thefreemedia

उस्मानाबादच्या नामकरणावरून राष्ट्रवादीच्या ४० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

उस्मानाबाद: उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायच्या आधी शहरांचे नामांतर केले. औरंगाबादचे संभाजी नगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव नगर असे केले. औरंगाबादच्या नामांतरावरून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी

Read More »

नागपुरात पहिल्यांदयाच LGBTQ+ प्राईड महिना (Pride Month) The Free Media आणि Click2Media कडून साजरा करण्यात आला

नागपूर: जून महिना हा LGBTQ प्राईड महिना (Pride Month) म्हणून ओळखला जातो. ह्याच महिन्याचा अजून आनंद वाढवायला द फ्री मीडिया (The Free Media) आणि Click2Media

Read More »

Latest News