The Free Media

thumbnail-thefreemedia

सा इंटरनॅशनल संस्थेमार्फत नुकतीच पहिली आंतरराष्ट्रीय ऑनलाईन वाद्यसंगीत परिषद घेण्यात आली.या परिषदेत भारतासह अमेरिका,नेदरलॅंडस,बेल्जियम मधील
25 कलावंतांनी आपला आविष्कार सादर केला.अध्यक्षस्थानी आंतरराष्ट्रीय कीर्तिचे शीळवादक डाॅ.मधुसूदन घाणेकर होते. ज्येष्ठ कलावंत कृष्णकांत चेके यांच्या
शुभहस्ते उदघाटन झाले. अक्षरआनंद इंटरनॅशनलचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.योगेश जोशी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.आघाडीचे गिटारवादक
आणि कवी यशवंत गरड हे या परिषदेचे मुख्य निमंत्रक होते. वर्ल्ड व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष प्रा.नागेश हुलावळे आणि सा इंटरनॅशनलच्या सहनिमंत्रक सौ.प्रतिमा अरुण काळे यांनी परिषदेचे संयोजन केले. निमंत्रक यशवंत गरड यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले.डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादित डहाळी विशेषांकाचे
प्रकाशन युवा तंत्रज्ञ रोहित लगाडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सौ.प्रतिमा काळे यांनी आभार मानले.

” वाद्ये ह्रदयाच्या तारा छेडतात, सा-या विश्वाच्या अस्तित्वाला लय प्राप्त करून देतात.रसिकांची महत्त्वाकांक्षा उंचवतात.प्रत्तेकाचे सृजनशील मन
ऊल्हासित करतात.भूतकाळातील आठवणींना उजाळा देतात.प्रत्येक रसिकाला हळुवार दिलासा देतात.. म्हणून दिवसभरात प्रत्येकाने एक तरी
तार छेडावे .”असे प्रतिपादन परिषदेचे अध्यक्ष सर डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी केले. परिषदेच्या प्रारंभी डाॅ.घाणेकर यांनी रसिक बलमा हे गाणे शीळवादनातून सादर करुन स्व.लतादीदींना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली. संपूर्ण परिषदेचे शीळवादन
आणि गायनासह निवेदन हे डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचे परिषदेतील खास वैशिष्ट्य होते. परिषदेचे औचित्य साधून, स्टार USA तर्फे डाॅ.मधुसूदन घाणेकर
यांना इंटरनॅशनल कल्चरल लाईफ टाईम अचिव्हमेंट ॲवाॅर्ड 2022
प्रदान करण्यात आला. समारोपात परिषदेतील सर्व वादक, संगीत अभ्यासक, आयोजक.संयोजक , तंत्रज्ञ यांना डाॅ.घाणेकर यांच्या शुभहस्ते


सा इंटरनॅशनल ॲवाॅर्डने सन्मानित करण्यात आले. अमेरिकेचे आर्यन धनेश्वर (सिंथेसायजर), बेल्जियमचे पियुषकुमार(गिटार), सान्वीकुमारी(पियानो), भारत-बेल्जियम मैत्रीसंघाच्या अध्यक्षा सौ.प्रीति दबडे (बासरी वाद्याची माहिती), राॅनित धर्मेश व्यास (पियानो ), नेदरलॅंडसच्या डाॅ.मानसी मोहरिल(झिलो फोन वाद्य परिचय आणि संगीत विषयक काव्य सादरीकरण) तसेच ॲड.प्रणिता देशपांडे(गिटार परिचय आणि संगीत विषयक काव्य), गोवा येथील आघाडीच्या युवा गायिका,संगीतकार,
गीतकार, कलावंत तन्मयी भिडे (कप साॅन्ग),,ज्येष्ठ संगीतकार
विवेक म्हसवडे(सिंथेसायझर), गोवा येथील प्रसिद्ध कलावंत संजय भिडे(माउथ ऑर्गन), आघाडीच्या कवयित्री ऋचा थत्ते (बासरी कविता )
याशिवाय देवराज पवार आणि तिलक गायकवाड (गिटार), प्रा.नागेश हुलावळे आणि रजनी मोरे (हार्मोनियम), स्वप्नील लगाडे (कॅजोन),शशांक साठे (सिंथेसायजर),
धनंजय अनगळ(माउथ ऑर्गन ), यश दबडे(तबला परिचय), सप्तस्वर इंटरनॅशनलचे सचिव विश्वास धोंगडे(सतार परिचय) आणि आंतरराष्ट्रीय कीर्तिचे युवा गिटारवादक
यशवंत गरड आदि मान्यवरांनी ही पहिली आंतराष्ट्रीय ऑनलाईन परिषद गाजवली.
वैश्विक एकात्मतेसाठी अशा संगीत विषयक परिषदांची आजच्या काळाला गरज आहे असे प्रतिपादन करत डाॅ.योगेश जोशी यांनी सा इंटरनॅशनल संस्थेच्या स्तुत्य उपक्रमाबाबत विशेष गौरव केला.सर्वच वादकांनी सादर केलेलीवाद्यांवरची(सोलो) मराठी-हिंदी गाणी यामुळे परिषद बहरली .

Share on Social media

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on linkedin
LinkedIn
Share on whatsapp
WhatsApp
Share on email
Email

Related Post

uddhavthackery-cm-thefreemedia

विधानसभेत बहुमत सिद्ध करा; राज्यपालांचा आदेश

नागपूर: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षातील एक मोठी बातमी आहे.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे सकारनं बहुमत गमावलं

Read More »
chip technology-thefreemedia

आर्मने (Arm )स्मार्टफोन गेम्ससाठी नवीन चिप तंत्रज्ञान लाँच केले

नागपूर: सॉफ्टबँक ग्रुप कॉर्पच्या मालकीची ब्रिटीश चिप टेक्नॉलॉजी फर्म आर्म लिमिटेडने (Arm Ltd) मंगळवारी नवीन चिप तंत्रज्ञानाच्या संचाचे अनावरण केले ज्याचा उद्देश असे आहे की,

Read More »
thumbnail-thefreemedia

‘आम्ही आयत्या बिळावरचे नागोबा नाहीत’; गुलाबराव पाटील

खासदार संजय राऊतांना गुलाबरावांचे प्रत्युत्तर गुवाहाटी: शिवसेना नेते संजय राऊत यांनी बंडखोर नेते गुलाबराव पाटील यांच्यावर सडकून टीका केली होती. गुलाबराव पाटलांना पुन्हा टपरीवर नाही

Read More »

Latest News