फेसबुक आता लैंगिक सामग्री पोस्ट करणाऱ्या खात्यांवर बंदी घालणार आहे. कंपनीने आपले धोरण अपडेट केले आहे. या अंतर्गत जर एखाद्या युझर्सने सेलिब्रिटीज, राजकारणी, क्रिकेटपटू आणि पत्रकार अशा सार्वजनिक व्यक्तींना लक्ष्य केले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. यामध्ये, युझर्सचे प्रोफाईल, पेज, ग्रुप किंवा इव्हेंट कायमचा काढून टाकला जाईल.
सोशल मीडियावर अनेक युझर्स बॉलिवूड स्टार्स, क्रिकेटपटू आणि राजकारणी यांच्या मिम्स बनवतात आणि शेअर करतात असे अनेकदा दिसून येते. आता असे विनोद करणे लोकांना भारी पडू शकते.
फेसबुकचे ग्लोबल सेफ्टी हेड अँटीगोन डेव्हिस यांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, जे युझर्स लोकांची प्रतिमा डागाळतात आणि ऑनलाईन त्रास देतात त्यांना कठोरपणे हाताळले जाईल. कंपनीने धोरणात बदल करून सार्वजनिक व्यक्ती आणि वैयक्तिकमधील फरक हायलाईट केला आहे, जेणेकरून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची योग्य अंमलबजावणी होऊ शकेल.
थेट संदेश पाठवण्याच्या नियमांमध्ये बदल होईल
फेसबुक लोकांना एकत्रितपणे लक्ष्य करणाऱ्या पोस्ट काढून टाकेल. यासह, इनबॉक्समध्ये थेट संदेश पाठवण्याचे नियम देखील बदलले जातील. कंपनी प्रोफाईल आणि पोस्टवरील कमेंट अधिक सुरक्षित करणार आहे. सेलिब्रिटी आणि प्रसिद्ध लोकांची फेसबुक यादी करेल असे फेसबुकने म्हटले आहे.