1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

‘अजूनही वेळ गेलेली नाही, युतीचा खेळ खेळू शकता’; आठवलेंचा भाजप सेनेला ‘काव्यमय’ सल्ला

ramdas athavale
Spread the love

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमात शिवसेना-भाजपच्या संभाव्य युतीच्या चर्चेला नव्यानं तोंड फुटलं आहे. भाजप शिवसेना युतीच्या मुद्यावरूनच आज केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ‘काव्यमय’ सकारात्मक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

रामदास आठवले यांनी एका मराठी वृत्तवहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिवसेना आणि भाजप पक्षाला सल्ला दिला आहे. ते म्हणाले,’अजूनही वेळ गेलेली नाही, अडीच-अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर युतीचा खेळ यशस्वी होऊ शकतो’ असा सल्ला त्यांनी दिला आहे.

ते पुढे म्हणाले, ‘उद्धव ठाकरे यांना कधीच मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती. मात्र, त्यांनी मांडलेल्या अडीच-अडीच वर्षाच्या प्रस्तावावर शिवसेना-भाजपमध्ये एकमत होऊ शकलं नाही. त्यामुळं जे व्हायला नको होतं, ते झालं. अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांनी पुन्हा स्वगृही परतावे,’ असा सल्ला आठवले यांनी दिला.

Claim Free Bets

त्यांनी पुढे हटके स्टाईलमध्ये कविताही बोलून दाखवली आहे,’उद्धव ठाकरेंनी महायुतीत यावे आणि देवेंद्र फडणवीसांचे गीत गावे… फडणवीसांनी एक दिवस मातोश्रीवर जावे आणि उद्धवजींना घेऊन परत यावे,’

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    महाराष्ट्रातील सौंदर्य आता मोबाईल अँपवर

    September 27th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the love२७ सप्टेंबर जागतिक पर्यटन दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पर्यटन विभागाने आयोजित केलेल्या एका ...

    जलयुक्त शिवार योजनेची चौकशी सुरूच; राज्य सरकार

    October 27th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveक्लिन चीट देण्याचा प्रश्नच येत नाही राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात राबवण्यात ...

    महाराष्ट्रातील दोन विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा यो...

    September 25th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमनोज गुंजाळ आणि सपना बाबर या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना उल्लेखनीय योगदानासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद...