1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना जमीन प्रदान करण्यासाठी विशेष मोहीम सुरु

DiDstrict Collector Mandhare
Spread the love

नाशिक जिल्ह्यातून शहीद झालेल्या वीर जवानांच्या कुटुंबियांना जमीन प्रदान करण्यासाठी विशेष मोहीम जिल्हा प्रशासनातर्फे हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सिन्नर येथील वीर माता यांना जमीन मंजुरीचा आदेश सुपूर्त करताना शहीद जवानास योग्यरीत्या श्रद्धांजली अर्पण केल्याचे समाधान असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले. ते आज जिल्हाधिकारी यांच्या दालनात झालेल्या जमीन मंजूर आदेश प्रदान कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, तहसीलदार राजेंद्र नजन, स्वीय सहायक संतोष तांदळे, दिनेश वाघ, आदित्य परदेशी, वीरमाता किसनाबाई बोडके, वीरपिता श्रीकृष्ण बोडके, प्रीती बोडके, सुरेश कातकाडे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले, देशाच्या सीमेवर कार्यरत असताना देशासाठी बलिदान केलेल्यांप्रती शासनाची भूमिका अतिशय संवेदनशील आहे.

जिल्ह्यातील आणखी काही प्रस्ताव आलेले आहेत. त्यावर काम सुरु असून त्यासाठी विशेष मोहीम आपण हाती घेतली आहे. २४ सप्टेंबर २००२ मध्ये जम्मू काश्मीर मधील दोडा जिल्ह्यात आपले कर्तव्य बजावत असताना शहीद श्रीकांत श्रीकृष्ण बोडके यांना वीरगती प्राप्त झाली होती. आज त्यांना जमीन मंजूर आदेश सुपूर्द करताना जवानास योग्यरीत्या श्रद्धांजली अर्पण केल्याचे समाधान आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    १२ आमदारांचे निलंबन रद्द; सर्वोच्च न्यायालय

    January 28th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveसर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्रातील 12 आमदारांचे निलंबन रद्द करून ठाकरे सरकारला मोठा झटका दिला आहे. यावर...

    उद्धव सरकारमधील मंत्र्यांचे घोटाळे उघडकीस आणणारच; कि...

    September 8th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveउद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील एका मंत्रांच्या स्वीय सहाय्य रात्री फोन करून मला मारण्याची धमकी देतो. मा...

    ‘राजकारणाचे गुन्हेगारीकरण होत चालले आहे.’

    November 16th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveचंद्रकांत पाटलांची ठाकरे सरकारवर टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकावर निशाणा साधला ...