1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

पाडवा विशेष…’मटणा’चे भाव गगनाला…!!!

mutton
Spread the love

श्रावण मास संपण्याची वाट बघणारे नागपूरकर व राज्यातील सर्वच नागरिकांच्या खिशास चाप बसणार असल्याची माहिती आज ‘फ्री मिडीया’शी बोलतांना नागरीकांनी दिली. कालपासून शहरात संततधार सुरु असतांना, तान्हा पोळा व पाडव्यावर विरजन पडते की काय? या संभ्रमात असतांना आज वरूण राजाने कृपा दाखवत विश्रांती घेतली आहे.

बकरा मंडीत सहज फेरफटका मारतांना “भाजी मार्केट” पेक्षा गर्दीला ऊत आलेला दिसला.सर्वांची पाऊले मटण विक्रेत्याच्या दुकानाकडे सरसावतांना दिसली. फ्री मिडीयाशी संवाद साधतांना, नागरिकांच्या प्रतिक्रीया तितक्याच बोलक्या होत्या. कोरोनाचा काळात धास्तावलेल्या नागरिकांनी गतसालपेक्षा यंदा कोरोनाची भीती नसल्याचे सांगत, आम्ही या महामारीपासून सावध झालो असल्याचे सांगितले.

मटण विक्रेत्याशी संवाद साधला असता, मागील सप्ताहापेक्षा दर अधिक असल्याचे माहितीवजा सांगितले. सध्या बाजारात ७०० ते ८०० रू किलो मटणाचा भाव असून सकाळपासून फोन बुकींग ते नागरिकांची रांग लागलेली बकरा मंडीत चित्र पहायला मिळाले. यंदाचा पाडवा हा गतसालपेक्षा कुटुंबासह आनंदात साजरा करणार असल्याचेही काहीजण म्हणाले. खरे पाहता नागपुरातील नागरिकांमध्ये उत्साह दिसून आला; जरी मटणाचे भाव गगनाला भिडले असले तरी; सावजी मटणाची चव घेण्यासाठी आजचा दिवस महत्वाचा असल्याच्या प्रतिक्रीया जनतेतून येत आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    फडणवीसांनी पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदतीचे दिले आश्वासन

    July 20th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveसमुद्रपुर: विदर्भात मुसळधार पाऊस आहे. वर्धा जिल्ह्यात ढगफुटी झाली असून, याची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री...

    राजनाथ सिंग यांनी ‘मल्टी-मोड हँड ग्रेनेड’...

    August 24th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveडीआरडीओच्या ‘टर्मिनल बॅलिस्टिक रिसर्च लॅबोरेटरी’च्या मदतीने इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्ह लिमिटेडने तय...

    उणे ३० च्या पाऱ्यात नागपूरकरांनी गाठले स्पिती; दिला ...

    January 10th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूरच्या सहा हिंमतवान युवक -युवती नावे डॉ नम्रता सिंग, राहुल बोरेले, चेतन कडू, ऋषभ अग्रवाल, मंथन पटले, अप...