1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

“जाऊ तिथं खाऊ आणि चोर चोर मावसभाऊ’; सदाभाऊ कडाडले

Spread the love

रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत नेहमी महाविकासाआघाडी सरकारवर टीका करत असतात. या ना त्या कारणाने ते नेहमी राज्यसरकारला कैचीत पकडण्याचा प्रयत्न करत असतात. आता देखील आरोग्य विभागाच्या कारभारावरून त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय.

आरोग्य विभागाच्या सहा हजार पदांसाठी राज्यभरातून तीन ते चार लाख उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. या सर्व उमेदवारांना या नियोजनातील गोंधळाचा फटका बसला आहे. यापूर्वी आरोग्य विभागाची परीक्षा नियोजनातील गोंधळामुळे रद्द करावी लागली होती. त्यानंतर २४ ऑक्टोबरला परिक्षा आयोजित करुनही आता या परिक्षेच्या नियोजनातही आरोग्य विभागाचे ढिसाळ नियोजन दिसून आल्याचा आरोप खोत यांनी केला आहे.

‘२४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी उमेदवारांनी पसंती दिलेल्या केंद्राऐवजी दूरचे केंद्र देण्यात आले आहे. सर्वात विचित्र बाब म्हणजे सकाळच्या सत्रात होणारा पेपर एका जिल्ह्यात तर दुपारच्या सत्रात होणारा पेपर दुसऱ्या जिल्ह्यात असे परीक्षा केंद्र देण्यात आले आहेत. हा प्रकार लक्षात आल्याने परीक्षा पुढे ढकलूनही नियोजनातील गोंधळाबाबत उमेदवारांनी तीव्र संताप केला आहे.

Claim Free Bets

अशा परिस्थितीत उमेदवार एका जिल्ह्यातील परिक्षा केंद्रावरुन दुसऱ्या जिल्ह्यातील परिक्षा केंद्रावर २-३ तासांत कसा पोहचणार, असा सवाल सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला आहे. मला वाटतं की तुम्ही ठरवलं आहे, की जाऊ तिथं खाऊ आणि चोर चोर मावसभाऊ आणि अर्ध अर्ध वाटून खाऊ, म्हणत खोत यांनी राज्य सरकारला चिमटा काढला आहे. त्यामुळे आता ठाकरे सरकार कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    फडणवीसांनी पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदतीचे दिले आश्वासन

    July 20th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveसमुद्रपुर: विदर्भात मुसळधार पाऊस आहे. वर्धा जिल्ह्यात ढगफुटी झाली असून, याची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री...

    काय सांगता..? मलेरीयाचे औषध आता कर्करोगावरही काम करेल

    March 22nd, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveअभ्यासपूर्ण संशोधनातून शास्त्रज्ञ व संशोधकांचा दावा मलेरियाचे औषध कर्करोगाच्या उपचारात महत्त्वाची भूमिका बज...

    जाहीर माफी मागा किंवा चर्चा करा; नितेश राणेंचे जावेद...

    September 6th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveचित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केली होती. त...