1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

राज्यातील शिक्षकांच्या प्रशिक्षणासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

Spread the love

इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲन्ड रिसर्च, पुणे (IISER) आणि इनिशिएटीव्ह ऑफ चेंज इन इंडिया, पाचगणी (IOFC) या संस्थेने महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेसोबत राज्यातील शिक्षकांच्या प्रशिक्षणासंदर्भात (MSFDA) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत सामजंस्य करार केला.

यावेळी इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲन्ड रिसर्च, पुणेचे रजिस्ट्रार जी. राजा शेखर, राष्ट्रीय उच्चत्तर शिक्षण अभियानचे सहसंचालक प्रमोद पाटील यांनी या करारावर स्वाक्षरी केली. यावेळी इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲन्ड रिसर्च (IISER), पुणेचे संचालक जयंत उदगावकर, इनिशिएटीव्ह ऑफ चेंज इन इंडियाचे (IOFC) विश्वस्त किरण गांधी, हे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास रस्तोगी, महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेचे कार्यकारी संचालक निपुण विनायक यावेळी उपस्थित होते.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सामंत म्हणाले, विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयातील नवीन कल्पना शिकवल्या गेल्या पाहिजेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा न्यूनगंड कमी केला पाहिजे. त्यांना इंग्रजी चांगल्या प्रकारे बोलता आली पाहिजे. यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावे.

Claim Free Bets

इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲन्ड रिसर्च, पुणे (IISER) या संस्थेच्या सायन्स शिक्षकांच्या माध्यमातून जास्त जास्त शिक्षकांपर्यंत पोहोचणे. तसेच राज्यामध्ये सध्या दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणामध्ये सुधारणा करणे. नवीन शैक्षणिक धोरण-2020 नुसार शिक्षकांना आधुनिक प्रशिक्षण देऊन त्यांना प्रशिक्षित करणे. हा या संस्थेचा उद्देश आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    ओमिक्रॉन भारतातील कोरोना संसर्गाचा प्रमुख प्रकार, डे...

    January 27th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: केंद्र सरकारने म्हटले आहे की देशात कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या प्रकरणांमध्ये, आता बहुतेक प्रकरणे...

    जालना – जळगाव रेल्वे मार्गाच्या अंतिम स्थान सर...

    May 14th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the love14 ते 17 मे या कालावधीत होणार हवाई सर्वेक्षण: रावसाहेब पाटील दानवे रेल्वे मंत्रालयाच्या वतीने जालना ते जळगा...

    ‘गुजरातमध्ये 21 हजार कोटीचं हेरॉईन सापडलं, मग ...

    September 22nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveबॉलीवूड अभिनेत्री रिया चक्रवतीच्या प्रकरणात मुंबईतील फिल्म इंडस्ट्रीमध्ये २ ग्रॅम हेरॉइन सापडलं होतं तेव्हा...