1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

उर्जामंत्र्यांच्या कारभारावर महाविकास आघाडीतील मंत्री नाराज

Uddhav Thackeray-thefreemedia
Spread the love

ऊर्जा विभागाच्या थकबाकीवर भूमिका आणि आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल बैठक बोलावली होती. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दादा भुसे, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासह काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण, विजय वड्डेटीवार, सुनिल केदार उपस्थित होते. बैठकीत महाविकास आघाडीतील नेत्यांनी राऊतांवर नाराजी व्यक्त केली, त्यामुळे थकबाकीचा आग्रह धरणारे नितीन राऊत हे कालच्या बैठकीत एकाकी पडले, अशी चर्चा सध्या रंगली आहे.

ऊर्जा विभागाच्या तब्बल ७३ हजार ८७९ कोटी रुपयांच्या थकबाकीवरून काल महाविकास आघाडी सरकारच्या बैठकीत मंत्र्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगले. सुमारे ७३ हजार ८९७ कोटी रूपयांची एकत्रित थकबाकी असल्याचे राऊतांनी यावेळी सांगितले. २०१४ ते जुलै २०२१ पर्यंतची दरवर्षीची थकबाकीची आकडेवारीही राऊत यांनी मांडली. भाजपच्या सत्ताकाळात थकबाकी वसुलीचे अपुरे प्रयत्न आणि कोरोनाकाळात वसुलीत आलेले अडथळे यामुळे थकबाकी वाढल्याचे राऊत यांनी सांगितले.

मात्र, सर्वच मंत्र्यांनी महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या ऊर्जा कंपन्यांच्या कारभारावर जोरदार प्रहार केले. ‘ऊर्जा विभागाने या सर्व कंपन्याचा कारभार तपासून पहावा’, असा सूर मंत्र्यांनी लावला. वीजनिर्मिती प्रकल्प वापरत असलेल्या कोळशाचा दर्जा, व्यवस्थापनात होणारा भरमसाठ खर्च आणि वीज कंपन्यांची मनमानी यावर नियंत्रण ठेवले असते तर हा प्रश्नच उद्भवला नसता, असा संताप काँग्रेसच्या मंत्र्यांनी उपस्थित केला. यावेळी राज्यभरात उद्योग, शेती, घरगुती आणि इतर व्यावसायिक वीज वापराची स्थिती आणि थकबाकीचे सादरीकरण ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केले.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    धक्कादायक! सभापतीच्या वडिलांना मारहाण

    October 22nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसोलापूरच्या रजनी भडकूंबे यांच्यावर अविश्वास ठराव उत्तर पंचायत समिती सभापती रजनी भडकुंबे यांच्यावर अविश्...

    सोमय्यावरील कारवाईशी मुख्यमंत्री कार्यालयाचा संबंध न...

    September 20th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveभाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईशी मुख्यमंत्री कार्यालयाचा काडीचाही संबंध नाही. ही ...

    उद्याचा दसरा मेळावा हा डोंगर कपारीतील कष्टकऱ्यांचा म...

    October 14th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveबीडमध्ये उद्या होणारा दसरा मेळावा हा कोणत्याही जातीपातीचा नाही. कोणत्याही वर्गाचा नाही. हा डोंगर कपारीतील क...