1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

आंदोलन करणा-या मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

mns
Spread the love

कोरोनाचा प्रकोप सुरु झाल्यानंतर राज्यातील मंदिरं बऱ्याच काळापासून बंद आहेत. ही मंदिरं उघडावीत या मागणीसाठी आता मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी भाजपने सुरू केलेल्या ‘शंखनादा’नंतर घंटानाद आंदोलन सुरू करण्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. त्याप्रमाणे आता नाशिकमध्ये आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी काळाराम मंदिरासमोर सरकारच्या नावाने आरती करत अनोखे आंदोलन केले.

मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसेने मंदिरे उघडण्याची मागणी करताना राज्य सरकारच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, या आंदोलनावेळी कोरोनाबाबतच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे देखील दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेत हे आंदोलन बंद पाडले.

दरम्यान, करोना प्रतिबंधाच्या निर्बंधामुळे राज्यातली मंदिरं दीर्घकाळापासून बंद आहेत. ही मंदिरं येत्या आठ दिवसांत उघडावीत, या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीने आक्रमक भूमिका घेत राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं केली होती. राज्यात आंदोलन करणाऱ्या नेत्यांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने आता मनसेबाबत प्रशासन काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    मुंबईत उलथापालथ होणारच; भाजपचे 20 नगरसेवक शिवबंधन बा...

    October 18th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसर्वच राजकीय पक्षांनी मुंबई महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यातच विविध पक्षांमध्ये इनकमि...

    ‘या’ तारखेस लागणार १२ वीचा निकाल

    June 7th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveलाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार पुणे: महाराष्ट्र बोर्डाच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांची प्रतीक्षा लवकर...

    अरुण हलदरांची राष्ट्रपतींकडे तक्रार करणार; नवाब मलिक

    November 1st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveएनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी अनेक गंभीर आ...