1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

चंद्र आणि मंगळावर सुद्धा चित्रपट; शुटींग साठी तयार शिपेन्को

Spread the love

रशियन चित्रपट दिग्दर्शक क्लिम शिपेन्को यांनी ते चंद्र आणि मंगळावर सुद्धा चित्रपटाचे शुटींग करण्यास तयार असल्याची घोषणा केली आहे. शिपेन्को नुकतेच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर त्यांच्या ‘द चॅलेंज’ चित्रपटाचे १२ तासाचे शुटींग पूर्ण करून पृथ्वीवर परतले आहेत. शिपेन्को म्हणाले अंतराळ स्थानकात शुटींग करताना चित्रपट शुटींग साठी किती विविध संधी आहेत याची जाणीव झाली. त्यामुळे आता सर्व शक्यता स्वीकारून कुठेही शुटींगची तयारी आहे. शिपेन्को यांनी अभिनेत्री युलिया पेरशिल्ड सोबत अंतराळ स्थानकात १२ दिवसात ३० तासांचे शुटींग केले.

रशियन मिडीयाने अंतराळात शूट झालेला जगातील पहिला चित्रपट म्हणून ‘द चॅलेंज’ला खूप प्रसिद्धी दिली आहे. शिपेन्को यांच्या मते चित्रपटाची कथा स्पेस म्हणजे अंतराळाशी संबंधित असेल तर त्याचे शुटींग अंतराळात झाले पाहिजे असे आता वाटते. त्यामुळे आगामी काळात चंद्रावर किंवा मंगळावर सुद्धा शुटींग साठी आम्ही तयार आहोत.

ऐलन मस्क, जेफ बेजोस या अमेरिकन उद्योजकांनी खासगी रॉकेट लाँच करून जगभर प्रसिद्धी मिळविली असताना रशियाचे रेंगाळलेले स्पेस मिशन, अपघात आणि त्यातील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे चर्चेत आहे. कदाचित त्यामुळेच अंतराळातील चित्रपट शुटींगला इतकी प्रसिद्धी दिली जात असावी असे बोलले जात आहे. रशियाने लवकरच स्वतःचे स्वतंत्र अंतराळस्थानक लाँच करण्याची तयारी झाल्याची घोषणा केली आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    मुल्ला बरादर आणि हक्कानी आमने- सामने ! पाकमुळे तालिब...

    September 7th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveअफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी तालिबानमध्ये अंतर्गत गटबाजी समोर येत आहे. यामध्ये तीन मुख्य नावे आ...

    Russia-Ukraine crisis I अमेरिकेने युक्रेनमधील स्वतःच...

    February 25th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: रशियाने युक्रेनवर ( Russia-Ukraine crisis) हल्ला केल्यावर अमेरिकेने सप्ष्टपणे म्हटले कि तो अमेरिकेच...

    भारत काश्मीरमधील लोकांवर अन्याय करतोय; पाकिस्तानी रा...

    September 14th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveपाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी आरोप केला की, भारत चीनशी असलेले त्यांचे संबंध खराब करण्याचा प्रयत्न...