1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

मुकेश अंबानीचा राज्याला ‘जय महाराष्ट्र’; तर,भारताला करणार बाय बाय?

mukesh ambani
Spread the love
रिलायन्स इंड्स्ट्रीज कडून स्पष्टीकरण…चर्चेला पूर्णविराम

भारताचे जगप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी हे नाव आता फक्त भारतच नाही तर जगभरात चर्चेत आलं आहे. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आण रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या लंडनमधील घराची गेल्या दोन दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. मुकेश अंबानींचं मुंबईतील आलिशान अँटिलिया हाऊस अजूनही उत्सुकतेचा आणि चर्चेचा विषय ठरत असताना आता त्यांच्या लंडनमधील घराचीही चर्चा सुरू झाली आहे.

लंडनच्या बकिंगहॅमशायरमध्ये त्यांनी तब्बल ३०० एकरची मालमत्ता खरेदी केली असून तिथल्या आलिशान घरात मुकेश अंबानी लवकरच शिफ्ट होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेवर खुद्द रिलायन्स इंडस्ट्रीजकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. मुकेश अंबानी लवकरच सहकुटुंब लंडनला वास्तव्यास जाणार असल्याचं सांगितलं जात होतं

त्या चर्चेवर रिलायन्स इंडस्ट्रीजकडून त्यावर अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. ‘मुकेश अंबानी लंडनमध्ये शिफ्ट होणार असल्याच्या वृत्तामध्ये कोणतेही तथ्य नाही. रिलायन्स इंडस्ट्रीजचे संचालक आणि त्यांचे कुटुंबीय लंडन किंवा जगाच्या पाठीवर इतरत्र कुठेही स्थलांतरीत होणार नाहीत. स्टोक पार्क इस्टेटमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजनं नुकत्याच खरेदी केलेल्या मालमत्तेचा मुख्य हेतू हा तिथे अत्याधुनिक सुविधांचं गोल्फ क्लब आणि स्पोर्टिंग रिसॉर्ट सुरू करणे हा आहे’, असं रिलान्सय इंडस्ट्रीजकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    माजी मुख्यमंत्री म्हणाले,’मला मंत्री नाही फक्त...

    January 24th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveगोव्यात पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमुळे राजकारण पेटले आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधील (BJP...

    जगातील सर्वाधिक सुरक्षित शहराच्या यादीत ‘महारा...

    September 4th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveजगातील सर्वात सुरक्षित शहरांची यादी समोर आली असून या यादीत भारतातील दोन शहरांचा समावेश आहे. तर, डेन्मार्कची...

    दिल्ली येथील जामा मशिदी येथे नुपूर शर्माच्या विरोधात...

    June 10th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात केलेल्या टिपण्णीमुळे वाद- विवाद वाढत चालला आहे. शुक्रवार, १० जुन रोज...