1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

शिक्षकांच्या लसीकरणासाठी केंद्र सरकार उपलब्ध करणार दोन कोटी डोस

Spread the love

केंद्र सरकार या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत देशभरातील शिक्षकांचे लसीकरण करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन कोटी अतिरिक्त डोस उपलब्ध करुन देणार आहे. बुधवारी सर्व राज्यातील अधिकाऱ्यांसोबत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी एक उच्च स्तरीय बैठक घेतल्यानंतर ही माहिती देण्यात आली. सर्व राज्यांतील शिक्षण विभागांशी या संबधी समन्वय साधून आवश्यक माहिती घेण्यात येणार आहे. केंद्राने देशातील शिक्षकांच्या लसीकरणासाठी उचललेले हे पाऊल अतिशय महत्वाचे मानले जात आहे.

देशातील अनेक राज्यांतील शाळा सुरु करण्याचा निर्णय त्या-त्या राज्य सरकारांनी घेतला असून अशावेळी केंद्राने सर्व राज्यांना शाळांतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या लसीकरणावर भर द्यावा, अशा सूचना दिल्या आहेत. त्यासंबंधीचे पाऊल म्हणून केंद्र सरकारने शिक्षकांच्या लसीकरणासाठी या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दोन कोटी अतिरिक्त डोस उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याचबरोबर केंद्राने सर्व राज्यांना देशातील ज्या लोकांनी पहिला डोस घेतला आहे त्यांना दुसरा डोस देण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती आहे. केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात एक आकडेवारी जारी केली होती. त्यामध्ये असे दिसून आले होते की कोरोना लसीचा पहिला डोस ज्या लोकांनी घेतला आहे, अशा 1.6 कोटी लोकांना दुसरा डोस हा वेळेत उपलब्ध झालेला नाही. यामध्ये एक कोटीहून जास्त ज्येष्ठ नागरिकांची संख्या आहे.

केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्यांना कोरोना लसीच्या दुसऱ्या डोसच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा स्तरावर माहिती गोळा करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ज्या जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचा कार्यक्रम कमी प्रमाणात झालेला आहे, त्या जिल्ह्यांची माहिती देखील मागवण्यात आली आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    औरंगाबादेत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचा अजब जाव...

    November 16th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveपेट्रोलच्या किंमती तर अमेरिका ठरवते; रावसाहेब दानवे आपल्या विनोदी आणि टोले मारण्याच्या भाषण शैलीसाठी प्रसिद...

    भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षांचा महिला सुरक्षेवरुन य...

    October 23rd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveवाराणसीमध्ये आयोजित वाल्मिकी महोत्सवच्या कार्यक्रमादरम्यान महिलांना संबोधित करताना महिला सुरक्षेवरून भाजपच्...

    संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख जाहीर

    January 14th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशात नवीन वर्षात संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. राज्यसभेचे २५६ वे अधिवेशन ३...