1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

मुंबई-कर्नाटक प्रदेशाचे नाव बदलून ‘कित्तूर कर्नाटक’ करणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

thumbnail-thefreemedia
Spread the love

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मुंबई-कर्नाटक प्रदेशाचे नाव बदलून ‘कित्तूर कर्नाटक प्रदेश’ ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोमवारी सांगितले की, मुंबई-कर्नाटक प्रदेशाचे नाव बदलून ‘कित्तूर कर्नाटक प्रदेश’ केले जाईल .वारंवार सीमा वाद निर्माण होत असताना जुने नाव ठेवण्यात अर्थ नाही, त्यामुळे या भागाचे नामांतर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. राज्याच्या ६५व्या स्थापना दिनानिमित्त असलेल्या ‘कर्नाटक राज्योत्सवा’दरम्यान बोम्मई यांनी ही घोषणा केली.

हैदराबाद-कर्नाटक क्षेत्राचे नाव आम्ही नुकतेच बदलून कल्याण कर्नाटक केले आहे. आता येत्या काही दिवसांत आम्ही मुंबई-कर्नाटक प्रदेशाचे नाव बदलणार आहोत असे मुख्यमंत्री म्हणाले. बेळगाव जिल्हा आणि कर्नाटकातील काही सीमावर्ती भाग महाराष्ट्रात विलीन करण्याच्या महाराष्ट्रातील राजकारण्यांनी वारंवार केलेल्या दाव्यांवर मुख्यमंत्री बोलत होते. येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही मुख्ममंत्री बोम्मई म्हणाले.

आगामी मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल, असे बोम्मई यांनी सांगितले आहे. उत्तर कर्नाटकातील जिल्ह्यांच्या गटाला कित्तूर कर्नाटक प्रदेश असे नाव देण्यामागील कारण मुख्यमंत्री स्पष्ट यांनी केले आहे.

“कर्नाटकच्या एकीकरणानंतर, आमच्या सीमा विवादांना सुरुवात झाली आणि ते सोडवले गेले. पण तरीही आम्हाला भांडण सुरु असल्याचे ऐकायला येते. इतक्या गोष्टी घडत असताना त्याला मुंबई-कर्नाटक म्हणण्यात काही अर्थ आहे का? १९५६ मध्ये जेव्हा राज्य पुनर्रचना कायदा लागू झाला तेव्हा या क्षेत्रात बदल व्हायला हवा होता. केवळ नाव बदलून त्या प्रदेशातील लोकांचे जीवनमान आणि विकास सुधारत नाही, प्रादेशिक असमतोल आणि असमानताही दूर करून सर्व प्रदेशांचा एकत्रित विकास झाला पाहिजे. राज्यातील कोणतेही क्षेत्र अविकसित न ठेवण्याचा संकल्प करून प्रादेशिक विषमता संपवण्यासाठी आपले सरकार प्रयत्नशील आहे,” असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    गोव्यात भाजपचे सरकार स्थापन होणार; विजयाचे सर्व श्रे...

    March 10th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveगोव्यात भाजपाचे सरकार स्थापन होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असून या निकालांबद्दल भाजपाचे गोव्यातील प्रभ...

    जॅकलीन फर्नांडिसवर ईडीची कारवाई; ७.२७ कोटींची मालमत...

    April 30th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the love२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखर आणि बॉलिवूड अभिनेत्री ‘जॅकलीन फर्नांडिस’...

    सलग तिस-यांदा निर्मला सीतारमण फोर्ब्सच्या यादीत

    December 8th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveयंदा चार भारतीय महिलांचा समावेश फोर्ब्सकडून दरवर्षी जगातील १०० सर्वात प्रभावी महिलांची यादी जाहीर केली जाते...