1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

माझा स्टॅन स्वामी होऊ नये, सचिन वाझेचं कोर्टात वक्तव्य

sachin waze
Spread the love

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया टॉवरजवळ कारमध्ये ठेवण्यात आलेली स्फोटकं आणि याच कारचा मालक मनसुख हिरन याची ठाण्यात झालेली हत्या या प्रकरणात अटकेत असलेला आणि मुंबई पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलेल्या सचिन वाझे याला हृदयविकारावरील उपचारांबाबत कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. न्यायालयानेसचिन वाझे याला हृदयाच्या आजाराशी संबंधी खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी दिली.

खासगी रुग्णालयात करण्यात येणाऱ्या उपचाराचा खर्च वाझे व त्याच्या कुटुंबिय करेल, असे विशेष एनआयए न्यायालयाने स्पष्ट केले. वाझे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी मिळावी यासाठी वाझे याने त्यांच्या वकिलामार्फत विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. आपल्या तीन धमन्यांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक ब्लॉकेज आहेत. डॉक्टरांनी तत्काळ शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे.

सचिन वाझेने कोर्टाला सांगितलं की आपला फादर स्टॅन स्वामी यांच्याप्रमाणे जेल कोठडीतच मृत्यू होऊ नये अशी आपली इच्छा आहे. त्यामुळे आपल्याला तातडीनं योग्य वैद्यकीय उपचारांची गरज असल्याचं त्यानं कोर्टाला सांगितलं. वाझेच्या वकिलांनी याआधी न्यायालयाला सांगितले होते की, मागील १४ दिवसांपासून त्याला जेजे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले जात आहे. तिथे त्याला ओपन हार्ट सर्जरी करण्याचा सल्ला मिळाला आहे. याबद्दलची परवानगी मागताना वाझे याने न्यायालयामध्ये ‘माझा स्टॅन स्वामी होऊ देऊ नका, मला लवकरात लवकर खाजगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी द्या,अशी विनंती केली.दरम्यान, शहरी नक्षलवाद प्रकरणातील 84 वर्षीय आरोपी फादर स्टॅन स्वामी यांचा काही महिन्यांपूर्वी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    गेल्या 24 तासात राज्यात 2294 नवे कोरोनाबाधित तर; 28 ...

    October 11th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही आठवड्यांपासून मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्...

    उर्जामंत्र्यांच्या कारभारावर महाविकास आघाडीतील मंत्र...

    September 15th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveऊर्जा विभागाच्या थकबाकीवर भूमिका आणि आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल बैठक बोलावली होती. ...

    महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम भाजप करत आहे: नवाब ...

    October 22nd, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveफिल्म इंडस्ट्रीच्या माध्यमातून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम भाजप करत आहे. एनसीबीचे सामील वानखेडे हे भाज...