1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

नागपूर -तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग बंद ; ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त

Nagpur-tuljapur
Spread the love

गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात अतिवृष्टी सुरू आहे. विदर्भातही पावसाने हाहाकार माजवला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे ईसापूर धरणाच्या पाणीसाठ्या मोठ्याप्रमाणात वाढ होऊन धरण 100 टक्के भरले आहे. त्यामुळे धरणाचे 12 दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे सध्या पैनगंगा नदीला पूर आला आहे. कयाधु नदीचे पाणी देखील पैनगंगेला मिळाले आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद उपविभागात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग बंद

या पुराच्या पाण्यामुळे विदर्भ मराठवाडाला जोडणाऱ्या उमरखेड मधील मार्लेगाव पुलावर पाणी पोहोचले आहे. पुराची ही परिस्थती लक्षात घेता संभाव्य धोका टाळण्यासाठी यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांनी मार्लेगाव पुलावरून वाहतूक बंद केली आहे. पुरस्थितीमुळे नागपूर बोरी-तूळजापूर हा महामार्ग बंद झाला असून पुलाच्या दोन्ही बाजूस वाहने थांबविण्यात आली आहे.

संततधार पावसामुळे धरणे भरली -जिल्ह्यात मंगळवारी पुसद उमरखेड या भागांमध्ये संततधार पाऊस सुरू होता. त्यामुळे या भागातील प्रकल्प, धरणे शंभर टक्के भरल्याने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. अशातच या पाण्यामुळे छोट्या-मोठ्या नदी नाल्यावरील पुलावरून पाणी वाहणे सुरू झाले आहे. त्यातच मंगळवारी अशाच एका पूल आलेल्या नाल्याच्या पूलावर एसटी वाहून गेल्याची घटना घडली आहे. यात चौघांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असल्यामुळेच जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आदेश काढून ज्या ठिकाणी पुलावरून पाणी वहात आहे. त्या ठिकाणीच वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्याचे आदेश दिले आहेत. याच बरोबर पूर परिस्थिती पाहण्यासाठी नागरिकांनी नदी नाल्यावर जाऊ नये, नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    नागपूर मेडिकल इस्पितळात नेजल स्प्रेची चाचणी; डॉ. प्र...

    October 2nd, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveकोरोना संकट लवकर संपविण्यासाठी देशातील आरोग्य विभाग सतत प्रयत्न करत आहेत. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी...

    आर्यन प्रकरणातील मुख्य साक्षीदार, फरारी किरण गोसावील...

    October 28th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the love आर्यन खान प्रकरणातील अमली पदार्थ विरोधी विभागाचा मुख्य साक्षीदार आणि फरारी घोषित केलेला आरोपी किरण गोसावी ...

    अयोध्या प्रकरणी राज ठाकरेंना विरोध करणाऱ्या खासदारास...

    May 8th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई :मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या भेटीपूर्वी उत्तर भारतीयांची माफी मागावी नाहीतर त्यांना अयोध्येत...