नागपूर जिल्हा परिषदेत एकूण १६ तर पंचायत समितीच्या ३१ जागांसाठी मतदान झाले होते. जिल्हा परिषदेसाठी आघाडी करण्याची साद शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला घातली होती. मात्र राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीने कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळे शिवसेना, आघाडी व भाजपात स्वबळावर लढत झाली. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार राष्ट्रवादीच्या चार जागांपैकी २ जागांवर भाजपाने तर एका जागेवर शेकापने विजय मिळविला आहे. ओबीसी आरक्षणामुळे नागपूर जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीच्या ४, काँग्रेसच्या ७, शेकापची १ तर भाजपाच्या ४ जागा रद्द झाल्या होत्या.
जिल्हा परिषदेच्या १६ जागांसाठी एकूण ७९ उमेदवार रिंगणात आहेत. तर पंचायत समित्यांच्या ३१ जागांसाठी १२५ उमेदवार रिंगणात आहे. यामध्ये शिवसेना जिल्हा परिषदेच्या १६ तर पंचायत समितीच्या ३१ जागांवर पोटनिवडणूक लढवत आहे. काँग्रेस राष्ट्रवादीदेखील इतक्याच जागा लढवत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा धक्का बसला आहे