The Free Media

WhatsApp-Image-2022-01-10-at-2.41.56-PM (1)

नागपूरच्या सहा हिंमतवान युवक -युवती नावे डॉ नम्रता सिंग, राहुल बोरेले, चेतन कडू, ऋषभ अग्रवाल, मंथन पटले, अपूर्व नायक यांनी नागपुर ते हिमाचल येथील स्पिती पर्यंत संदेश देत बाईक राईड केली.”विंटर सिप्ती एक्सपीडीशन” या नावाने असणारी हि बाईक राईड पूर्ण करणारी हि नागपुरातील सर्वात पहिली टीम आहे.

या आधी पण असे खडतर प्रवास त्यांनी केले आहे .नागपूर ते नेपाळ, नागपूर ते नाशिक सायकल रॅली ज्यामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ, शिक्षण संबंधित जनजागृती करण्याकरिता रॅली त्यांनी त्यांनी केली आहे. डिसेम्बर मध्ये त्यांच्या टीमने ‘विंटर सिप्ती’ जाण्याचा विचार केला. त्यावर रिसर्च केला.

डॉ नम्रता सिंग (भिलाई) देखील त्यांच्यात सामील झाल्या. ‘विंटर सिप्ती’ राईड’ ची सुरवात १९ डिसेम्बरच्या सकाळी नागपूर येथून झाली. त्यांनतर टीमने सागर, झांसी, आग्रा अशा ठिकाणी हॉल्ट घेत दिल्ली पर्यंत पोहचहले. दिल्ली येथून चंदिगढ, झिरकपूर गुरुद्वारा रूट घेऊन शिमला मार्गाने काझा पर्यंत रॅली पूर्ण केली.

या टीमने २०१७ मध्ये नागपूर ते नेपाळ ,गोल्डन क्वाड्रिल्याट्रल केलं आहे. “विविध संदेश देत नागपूर ते हैद्राबाद ,नागपूर ते गोवा प्रवास केले आहेत. पण ‘ विंटर सिप्ती’ हा एक आगळावेगळा अनुभव होता. सगळ्यात मोठं आव्हान हे थंडी होत. कारण सतत प्रत्येक स्थळी बदलणारे वातावरण होते. प्रचंड थंडी होती, गारठलेले वारे होते. उणे २० , उणे ३० अंश इतका कमी पारा तिकडे असतो. अशा ठिकाणी गाडी चालवणे एक मोठे आवाहन होते. अशा तापमानाची शरीराला सवय नसते, त्यामुळे हा एक जबरदस्त अनुभव होता असे”, मंथन पटले यांनी सांगितले.

तिकडे रस्ते बर्फाच्या लादीने भरलेले असतात. अशा ठिकाणी गाडी निसटते, ब्रेक लगेच लागत नाहीत. तिथे गाडी चालवणे आमच्या टीम साठी फारच आवाहनात्मक होते. तसेच अशा ठिकाणी गाडी चालविण्याचा धोका इतका असतो कि, बाजूने स्पिती नदी दरीतून वाहत असते आणि पहाड तोडून रस्ता बनवलेला असतो. लँड स्लायडिंगची भीती असते. मला तर असा पण अनुभव आला कि अचानक लँड स्लायडिंग झाले आणि गाडीच्या समोरच्या भागावर मडगार्ड वर ते पडले. थोडा जरी समोर असतो तर डोक्यावर पडण्याची भीती होती”, असे मंथन पटले यांनी सांगितले. गाड्या खाई मध्ये पडता पडता वाचल्या. हिक्कीम हि जागा हायेस्ट मोटरेबल व्हिलेज आहे. तिथे जात असतांना स्नो लेपोर्ड ने टीम ला घेरले होते. अशी अनेक अनुभव आमच्या टीमला आले.

एकूण प्रवास नागपूर-स्पिती-नागपूर हा ४५०० किलोमीटरचा होता. आमची अपार नावाची टीम आहे त्याचा संदेश बेटी बचाओ बेटी पढाओ असा होता. या वेळेस आमच्या सोबत डॉ. नम्रता सिंग देखील जुळल्या होत्या. त्या ब्रेस्ट अँड सरवाईकलच्या डॉक्टर आहेत. आमची टीम यावेळेस दोन संदेश घेऊन जात होती. कॅन्सरमुक्त हा संदेश देखील आम्ही घेऊन गेलो होतो. यात वूमन हायजिन, महिलांचे विविध समस्या विषयी जनजागृतीचे संदेश दिले.

नागपूर ते रायपूर ‘झाडे लावा झाडे जगवा’ हा संदेश पायी चालून दिला होता त्यावेळेला ५०० रोप लावले होते. २०१६ वर्षात ऑगस्टमध्ये ह्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये देखील नोंदणी झाली होती. इरॅडिकॅशन ऑफ ईललिटरसी हा संदेश देत नागपूर ते नासिक ७०८ किलोमीटर प्रस्वास सायकलने केला होता त्यामध्ये गावो-गावी जाऊन निरक्षरता निर्मूलनचा संदेश दिला होता. २०१७ मध्ये नागपूर ते नेपाळ बाईक ने संदेश देत रॅली केली होती. पुढे माऊंट एव्हरेस्ट जाण्याची योजना आहे. एकदातरी आयुष्यत बाईक राईड करायला हवी असे मंथन पटले म्हणाले.

Share on Social media

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on linkedin
LinkedIn
Share on whatsapp
WhatsApp
Share on email
Email

Related Post

Tata Steel-thefreemedia

टाटा स्टील (Tata Steel) 4 वर्षांमध्ये नवीन तंत्रज्ञानाच्या विकासावर 1,200 कोटी रुपये खर्च करणार

नागपूर:Tata Steel Ltd ने पुढील तीन ते चार वर्षात नवीन तंत्रज्ञानाच्या विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. स्टील च नव्हे तर इतर साहित्यात प्रवेश करण्याच्या प्रयत्नाचा

Read More »
uddhavthackery-cm-thefreemedia

विधानसभेत बहुमत सिद्ध करा; राज्यपालांचा आदेश

नागपूर: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षातील एक मोठी बातमी आहे.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे सकारनं बहुमत गमावलं

Read More »
chip technology-thefreemedia

आर्मने (Arm )स्मार्टफोन गेम्ससाठी नवीन चिप तंत्रज्ञान लाँच केले

नागपूर: सॉफ्टबँक ग्रुप कॉर्पच्या मालकीची ब्रिटीश चिप टेक्नॉलॉजी फर्म आर्म लिमिटेडने (Arm Ltd) मंगळवारी नवीन चिप तंत्रज्ञानाच्या संचाचे अनावरण केले ज्याचा उद्देश असे आहे की,

Read More »

Latest News