1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

पद्मनाभ स्वामी मंदिर ट्रस्टला करावे लागेल 25 वर्षाचे ऑडिट: सर्वोच्च न्यायालय

supremecourt-thefreemedia
Spread the love

सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी गेल्या २५ वर्षांपासून उत्पन्न आणि खर्चाचे केरळच्या तिरुअनंतपुरम येथील पद्मनाभ स्वामी मंदिर ट्रस्टला लेखापरीक्षण (ऑडिट) करावे लागेल, असे सांगितले आहे. हा निर्णय न्यायमूर्ती यूयू ललित, न्यायमूर्ती एस आर भट आणि न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी यांच्या तीन सदस्यीय खंडपीठाने दिला. मंदिर आणि ट्रस्ट या दोन्हींचा आर्थिक खर्च लेखापरीक्षणात समावेश असणे आवश्यक असून हे ऑडिट तीन महिन्यांच्या कालावधीत पूर्ण झाले पाहिजे, असेही खंडपीठाने म्हटले. त्रावणकोर राजघराण्याने पद्मनाभ स्वामी मंदिर हे बांधलेले आहे.

गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऑडिटमधून सूट मागण्यासाठी पद्मनाभ स्वामी मंदिर ट्रस्टने न्यायालयात धाव घेतली होती. ट्रस्टने असा युक्तिवाद केला की, केवळ ही ट्रस्ट पूजा आणि विधी यांसंबंधी गोष्टींसाठी उभारण्यात आली होती. ट्रस्टला मंदिर प्रशासनासंबंधीत कोणतेही करण्याचा अधिकार नाहीत. त्यामुळे त्याचे अस्तित्व मंदिरापासून वेगळे असल्यामुळे त्याचा ऑडिटमध्ये समावेश करण्यात येऊ नये.

जिल्हा न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखालील मंदिराच्या प्रशासकीय समितीने असा युक्तिवाद केला, की कोरोनामुळे मंदिर प्रशासन आर्थिक अडचणीत आहे. कोरोनामुळे देणग्या येत नाहीत, शिवाय मंदिर भाविकांसाठी बंद असल्यामुळे कोणतेही उत्पन्न नाही. त्यामुळे दैनंदिन खर्च भागवण्यास अडचणी येत आहेत. प्रशासकीय समितीची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील आर बसंत यांनी न्यायालयाला सांगितले की, केरळमधील सर्व मंदिरे कोरोनामुळे बंद आहेत. या मंदिराचा मासिक खर्च सुमारे सव्वा कोटी रुपये आहे, परंतु सध्या फक्त ६०-७० लाख रुपये देणगी मिळत आहे. त्यामुळे मंदिर चालवण्यात अडचणी येत असल्यामुळे ट्रस्टचे योगदान महत्वाचे आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    ज्ञानदेव वानखेडेंच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टाने काय...

    November 23rd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांना आपल्या कुटुंबियांविरोधात वक्तव्य करण्यापासून रोख...

    मास्क न लावल्याने लष्कराच्या जवानास पोलिसांनी केली अ...

    September 2nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveझारखंडमधील चतरा जिल्ह्यात पोलिसांनी भारतीय लष्कराच्या एका जवानाला अमानुषपणे बेदम मारहाण केल्याची घटना घडली ...

    फरार अशिष मिश्राच्या घरावर पोलिसांनी चिटकविले समन्स

    October 8th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveउत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांना चिरडल्याच्या आरोपात केंद्रीय राज्य मंत्री अजय मिश्रा यांचा म...