1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना धमकीसह शिवीगाळ

Spread the love

कठोर कारवाईची मागणी अन्यथा जेलभरो आंदोलनचा इशारा

नागपूर: गुरूनानक इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजी, दहेगाव येथील महाविद्यालयात गेल्या एक वर्षापासून कर्मचारी व व्यवस्थापनातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याच्या थकीत वेतनला घेऊन व्यवस्थापन व कर्मचारी यांच्यामध्ये चांगलाच वाद चालू आहे व कायदेशीर मार्गाने आम्ही आमचा थकीत वेतनाचा हक्क मागण्यासाठी आमच्या कर्मचाऱ्याचं शिस्तमंडळ प्राचार्य श्री. हेमंत हजारे यांच्याकडे थकीत वेतनावर चर्चा करण्यासाठी गेलो असता व्यवस्थापनाच्या वतीने प्राचार्य डॉ. हेमंत हजारे आमच्या कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ करून आम्हाला बघून घेऊ तसेच मानसिक, शारिरीक त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहे. तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे जा आणि तुम्हाला जे करायचे आहे ते तुम्ही करा अशी धमकीही देत असल्याचे प्राध्यापकांनी पत्र परिषदेत सांगितले, ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

पुढे त्यांनी सांगितले, प्राचार्य म्हणतात, की नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू सुद्धा माझे काही करू शकत नाही,सअशी अरेरावीची भाषा त्यांनी केली. त्या संदर्भात आम्ही नुकतेच कळमेश्वर ग्रामीण पोलीस स्टेशनला प्राचार्य यांच्या विरोधात तक्रार दिली. आमच्या तक्रारीवर कळमेश्वर ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये ५०४/५०५ अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे.

मागील एक वर्षापासून संस्थेचे संचालक डॉ.सुधीर शेळके, उप-प्राचार्य प्रा.राजेन्द्र भोंबे हे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या पूर्वनियोजित कट करून हेतूपुरस्सर आम्हाला रोज मानसिक त्रास देत आहे. संस्था व्यवस्थाकांनी तसेच अध्यक्षांनी तात्काळ प्राचार्य डॉ. हेमंत हजारे, अप्रत्यक्ष सहभागी डॉ. सुधीर शेळके आणि उप प्राचार्य प्रा. राजेन्द्र भोंबे यांच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा आम्ही सारथी असोसिएशन महाराष्ट्र राज्य, चंद्रपूरचा पाठिंबा घेऊन आम्ही सर्व संस्थेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी बंड पुकारून जेलभरो आंदोलन करणार आहे.

पुढील होणाऱ्या परिणामास संस्था प्रशासन जबाबदार राहणार अशी माहिती प्रविण भिसे व सारथी असोसिएशन महाराष्ट्र राज्य, चंद्रपूरचे अध्यक्ष देवेंद्र सायसे यांनी पत्रपरिषदेत दिली. यावेळी प्रविण भिसे, जस्पाल गिडवानी, किशोर वाघ, राजेंद्र काटोले, दिलीप बुधलानी, एकता मेश्राम, अमर बानमारे, कल्पना मालपे पत्रपरिषदेस उपस्थित होते.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    वर्ध्यात 11 कवट्या, 54 गर्भाची हाडे सापडली; डॉ रेखा ...

    January 14th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveवर्धा: बेकायदेशीर गर्भपाताच्या एका वेगळ्या प्रकरणाच्या तपासादरम्यान वर्धा येथील आर्वी येथील एका खाजगी रुग्ण...

    नागपूर विधान परिषद निवडणूक : भाजपचे बावनकुळे विजयी, ...

    December 14th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveNagpur Legislative Council Election Results : विधान परिषदेच्या नागपूर जिल्हा स्थानिक स्वराज्य मतदार संघाच्य...

    वागधरा (गुम.) येथे संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी

    February 24th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveहिंगणा: वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या १४६ व्या जयंती निमित्ताने ग्रामपंचायत वागधरा (गुम.)च्या वतीने प...