1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

“तुम्हाला फक्त पवार साहेबांसाठी काम करायचे लक्षात ठेवा; जयंत पाटील

Jayant Patil
Spread the love

राष्ट्रवादी पूर्वपदावर येईल आणि पुन्हा जुने दिवस परत येतील. राष्ट्रवादीला इथे स्कोप आहे असे अनेक सर्व्हे सांगतात त्यामुळे आपल्या सर्वांचा एकच नेता आहे ते म्हणजे आदरणीय पवारसाहेब… तुम्हाला फक्त पवारसाहेबांसाठी काम करायचे हे लक्षात ठेवा आणि कामाला लागा अशी साद राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी घातली.

मिरा – भाईंदर विधानसभा मतदारसंघाचा आढावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज घेतला त्यावेळी ते बोलत होते. आपला नेता सर्वात जास्त अनुभवी आहे. अगदी विरोधकांना विचारले तरी ते सांगतील पवारसाहेब मोठे नेते आहे. त्यामुळे मागचा कालखंड पाहिला तर अनेक जण आज पवारसाहेबांच्या विचारांनी प्रभावित होत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करू इच्छितात. त्यांना सोबत घेऊन पक्ष वाढवा असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले. मतमोजणीची तारीख डोक्यात ठेवून लोकांच्या छोट्या-मोठ्या कामांची पूर्तता करा. आरोग्याशी संबंधित कामे, त्यांच्या रेशनकार्डची कामे, वॉटर मीटर, गटाराच्या प्रश्नांची सोडवणूक करा असे मार्गदर्शनही जयंत पाटील यांनी केले.

१९९९ ला राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर पक्षाने सर्वत्र आपली विजयी घोडदौड सुरू ठेवली. तीच घोडदौड मिरा-भाईंदरमध्ये ही कायम ठेवली म्हणून सुरुवातीचे बरेच काळ इथे राष्ट्रवादीची सत्ता होती. मधल्या काळात इथे सत्तांतर झाले पण आपल्याला येत्या काळात ही परिस्थिती बदलायची आहे असे आवाहन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना केले. स्थानिक नेत्यांच्या भ्रष्टाचाराला लोकं कंटाळली आहे. लोकांना इथे बदल हवा आहे. येणार्‍या काळात बऱ्याच गोष्टी घडतील फक्त आपली एकजूट आपल्याला कायम ठेवायची आहे. मला खात्री आहे आपण इथे राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा विश्वास जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    ‘आम्ही आयत्या बिळावरचे नागोबा नाहीत’; गु...

    June 29th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveखासदार संजय राऊतांना गुलाबरावांचे प्रत्युत्तर गुवाहाटी: शिवसेना नेते संजय राऊत यांनी बंडखोर नेते गुलाबराव प...

    1 नोव्हेंबर पासून उघडणार व्यावसायिक महाविद्यालये

    September 11th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveबारावीनंतरच्या विविध सीईटीच्या तारखा जाहीर करतानाच अभियांत्रिकी, फार्मसी, व्यवस्थापनासह राज्यातील सर्व व्या...

    बोंडे व महाडीकपैकी धोका कुणाला?; फडणविसांना मिटकरीचा...

    June 10th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveआज दि १० जून रोजी महाराष्ट्रात राज्यसभेच्या 6 जागांसाठी मतदान होत आहे. दोन तासात १५३ जणांनी मतदान केल्याची ...