1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

निवृत्त न्यायाधीश करणार लखीमपूर हिंसाचार प्रकरणाचा तपास; दोन महिन्यांची डेडलाईन

Lakhimpur violence
Spread the love

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणी योगी सरकारने एक सदस्यीय समिती गठीत केली असून या प्रकरणाचा तपास निवृत्त न्यायाधीशांकडे सोपविण्यात आला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश प्रदीप कुमार श्रीवास्तव हे या घटनेची चौकशी करणार आहेत. ही चौकशी पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांचा अवधी देण्यात आला आहे.

३ ऑक्टोबर रोजी केंद्रीय मंत्र्याच्या वाहनांच्या ताफ्यात चिरडून चार शेतकऱ्यांसह एकूण आठ जणांचा मृत्यू झाला होता. केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने या शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप आहे. या प्रकरणामुळे देशभरातून प्रचंड संताप व्यक्त होत असल्याने योगी सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला आहे.

७ ऑक्टोबर रोजी म्हणजेच आज सर्वोच्च न्यायालयात देखील या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. सर्वेच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन व्ही रमण यांच्या अध्यक्षतेखाली तीन न्यायाधीशांचे खंडपीठ या प्रकरणावर सुनावणी करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी स्वत:हून दखल घेतली आहे. त्यानंतर आज सर्वोच्च न्यायालय या प्रकरणावर सुनावणी घेणार असल्याचे न्यायालयाने जाहिर केले आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    कुपोषणाविरुद्ध लढण्याकरिता “न्यूट्रिशन स्मार्ट...

    November 11th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर (Union Agriculture Minister Narendra Singh Tomar) यांनी बुधव...

    दिपाली चव्हाण यांना मृत्यूनंतरही न्याय मिळत नसल्याची...

    September 4th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveअमरावती जिल्ह्यातीथ मेळघाट शिवारातील हरिसाल येथे वनविभागात आर एफ ओ पदावर कार्यरत असलेल्या दीपाली चव्हाण यां...

    ईशान्येकडील भागात दुर्लक्ष केले: पंतप्रधान नरेंद्र म...

    January 5th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी नवी दिल्लीतील आधीच्या सरकारांवर ईशान्येकडील भागात दुर्लक्ष केल्याचा आ...