कामगार नेते त्या नेत्यांना पाठबळ काही राजकीय पक्ष हे जर संप चिघळवत ठेवणार असतील, तर ते हजारो कामगारांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे नुकसान करत आहेत आणि एसटी कामगारांचा गिरणी कामगार करायचा आहे का ? करू नका … असा प्रश्न शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पार्टीवर टीका केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारकडून दिलेल्या वेतन वाढवर बोलताना आज २५ नोव्हेंबर राऊतांनी भाजपवर निशाणा साधला.
राज्य सरकारने खास करून परिवहन मंत्री अनिल परब यांनी काल २४ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आणि त्या आधी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपा विषयी चर्चा केली.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपातून तोडगा काढण्यासाठी सरकारने कामगारांना चांगले आर्थिक पाठबळ किंवा मदत मिळावी. म्हणून परबांनी एसटी कर्मचाऱ्यांना चांगले पॅकेज जाहीर केले आहे. मला असे वाटते परिवन मंत्र्यांनी जे काही आकडे दिलेले आहेत त्यात साधारण कमीतकमी ५ हजार रुपये पगार वाढ ते २४ हजार रुपयापर्यंत वाढ करण्यात आली आहे. शिवाय यांची तरतूद सुद्धा राज्य सरकार करणार आहे, असे म्हणत राऊतांनी राज्य सरकारच्या निर्णयाचे भरभरून कौतुक केले आहे.
राजकीय नेते संप चिघळवत आहेत. राज्य सरकारने एसटी कामगारांच्या वेतनात वाढ केली आहे. तरीही कामगारांचे नेते आणि त्या नेत्यांना पाठबळ काही राजकीय पक्ष हे जर संप चिघळवत ठेवणार असतील. तर ते हजारो कामगारांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे नुकसान करत आहेत. त्यांना एसटी कामगारांचा गिरणी कामगार करायचा आहे का? करू नका. राज्य सरकार आणि राज्याचे मुख्यमंत्री आम्ही सगळे लोक कामगारांच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील आहोत. कारण हा जो महाराष्ट्र आहे.मुंबई जी आहे ही कामगार आणि शेतकऱ्यांच्या लढ्यातून आम्हाला मिळली आहे. कष्टकऱ्यांचे नुकसान व्हावे,असे आमचे सरकार कधीही करणार नाही.